पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : इतिहासातून तरी धडा घ्या!!; देवेगौडांनी ठणकावले


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवण्यात आली. तिचे उल्लंघन झाले. या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय गदारोळ सुरू असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र एक वेगळा गंभीर सूर आळवला आहे. Error in PM’s security: Learn a lesson from history !!; Devegowda knocked

पंतप्रधानांसारख्या सर्वोच्च कार्यकारी अधिकाऱ्याच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळणे हे अत्यंत गैर आहे. इतिहासापासून आपण धडा घेतला पाहिजे, अशा कठोर शब्दांमध्ये देवेगौडा यांनी पंजाब सरकारला सुनावले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यानंतर भाजप विरुद्ध काँग्रेस असे राजकीय भांडण असल्याचे स्वरूप देण्याचा देशात प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावर मोदी समर्थक आणि मोदी विरोधक यांची अनेक ठिकाणी पातळी सोडून भांडणे जुंपली आहेत. या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी केलेले ट्विट गंभीर आणि महत्त्वाचे आहे.

सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या इतिहासापासून आपण धडा घेतला पाहिजे, असे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च कार्यकारी पदाच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी वादग्रस्तता निर्माण होणे हीच मूळात गैर बाब आहे. कोणत्याही स्थितीत आपण आत्ममग्न किंवा स्वार्थी राहता कामा नये पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था ही पक्षीय आणि वैयक्तिक राजकारणाच्या पलिकडची गोष्ट आहे आणि म्हणूनच इतिहासापासून धडा घेऊन आपण वागले पाहिजे, अशा शब्दांत देवेगौडा यांनी पंजाब सरकार आणि तेथील सत्ताधारी काँग्रेसचे कान टोचले आहेत.

Error in PM’s security: Learn a lesson from history !!; Devegowda knocked

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात