Delhi High Court Judgement Mask Mandatory while Driving for a single person in a car

Mask Mandatory while Driving : कारमध्ये एकट्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mask Mandatory while Driving : दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोना नियमांशी संबंधित एक मोठा आदेश दिला आहे. कोर्टाने असे म्हटले आहे की, कारच्या आत एकट्या बसलेल्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक असेल. दिल्ली हायकोर्टाने कारला सार्वजनिक ठिकाण मानले आहे. कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखू शकणारा मास्क ही ‘संरक्षक ढाल’ असल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे. Delhi High Court Judgement Mask Mandatory while Driving for a single person in a car


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोना नियमांशी संबंधित एक मोठा आदेश दिला आहे. कोर्टाने असे म्हटले आहे की, कारच्या आत एकट्या बसलेल्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक असेल. दिल्ली हायकोर्टाने कारला सार्वजनिक ठिकाण मानले आहे. कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखू शकणारा मास्क ही ‘संरक्षक ढाल’ असल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे.

हायकोर्टात एक याचिका दाखल करून कारमध्ये एकटे बसलेल्या व्यक्तीने मास्क घालण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. राजधानी दिल्लीत मास्क न घातल्याबद्दल दोन हजार रुपये दंड आहे. पोलिसांनी जेव्हा कारमध्ये एकट्या बसलेल्या व्यक्तीलाही मास्क न घातल्याने दंड ठोठावल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. यावरून मोठा निर्माण झाला होता. यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. आता हायकोर्टाच्या आदेशानंतर मात्र सर्वांनाच मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोनाचा मोठा उद्रेक

मंगळवारी दिल्लीमध्ये कोरोनाचे -5100 नवीन रुग्ण आढळले. गतवर्षी 27 नोव्हेंबरनंतर एका दिवसात येथे नोंदविल्या जाणाऱ्या या सर्वाधिक घटना आहेत. गतवर्षी 27 नोव्हेंबर रोजी शहरात 5,482 रुग्ण आढळले होते. दिल्ली आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी या संसर्गामुळे आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला, मृतांची संख्या वाढून 11,113 झाली. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा दर 4.93 टक्के आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, आप सरकार साथीच्या आजाराविषयी सावध असून यावर लक्ष ठेवून आहे.

Delhi High Court Judgement Mask Mandatory while Driving for a single person in a car

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*