वसुली प्रकरणात देशमुखांच्या बचावात उतरली शिवसेना, विरोधकांवर ‘सामना’तून टोलेबाजी, येडियुरप्पांचं दिलं उदाहरण

Shiv Sena defends Deshmukh in recovery case, hits Opposition in Todays Saamana Editorial

Todays Saamana Editorial : 100 कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने विरोधकांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयमध्ये अनिल देशमुख यांच्या विषयावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. देशमुखांना एक न्याय आणि येडियुरप्पांना एक न्याय, असा आरोप याद्वारे करण्यात आला आहे. विरोधाचा पुरावा नसल्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप करून राज्य सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असेही यात लिहिण्यात आले आहे. Shiv Sena defends Deshmukh in recovery case, hits Opposition in Todays Saamana Editorial


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 100 कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने विरोधकांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयमध्ये अनिल देशमुख यांच्या विषयावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. देशमुखांना एक न्याय आणि येडियुरप्पांना एक न्याय, असा आरोप याद्वारे करण्यात आला आहे. विरोधाचा पुरावा नसल्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप करून राज्य सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असेही यात लिहिण्यात आले आहे.

काय आहे सामनाच्या अग्रलेखात?

यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता. विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच काहीतरी पुरावे होते म्हणून हल्ले केले. आज साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे. महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे. राज्याची सत्ता त्यांना हवी आहे व त्यासाठी सध्या आहे ती घडी उलथवायची आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची विरोधकांची तयारी असेलही, पण ते जमेल असे दिसत नाही!

देशमुखांवरील आरोपांची सत्यता काय?

मुंबईचे उचलबांगडी केलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि वसुलीचे आरोप केले. परमबीर सिंग यांनी बेफाट आरोप केले व उच्च न्यायालयाने ते उचलून धरले. आरोपांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. यावर गृहमंत्री देशमुखांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. देशमुखांनी राजीनामा दिला व त्यांच्या जागी दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. वनखात्याचे मंत्री संजय राठोड यांनी दीड महिन्यापूर्वी राजीनामा दिला. पाठोपाठ गृहमंत्री देशमुखांनाच जावे लागले. देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते हे मान्य केले तरी या आरोपांची सत्यता काय? खरेखोटे सिद्ध व्हायचे आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावर कायम ठेवले असते तर हे वसुलीचे आरोप त्यांनी केले नसते. त्यांचे पद ‘वाझे गेट’ प्रकरणात गेल्यावर त्यांनी हा पत्राचा खेळ केला, असे मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे.

परमबीरांचा बोलविता धनी दुसराच!

परमबीर यांनी पत्र लिहिले व खळबळ उडवून दिली, पण त्या पत्राचा प्रवास पाहता त्यांचा बोलविता आणि करविता धनी कोणी दुसराच आहे हे आता पटू लागले आहे. राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार हा उखडून फेकलाच पाहिजे. या स्वच्छता अभियानाचे कार्य न्यायालयाने हाती घेतले असेल तर आनंदच आहे, पण अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा हवेत गोळीबार होत असताना उच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

येडियुरप्पांना वेगळा न्याय का?

त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरच स्थगिती आणली आहे. म्हणजे देशमुख यांना वेगळा न्याय व येडियुरप्पांना वेगळा न्याय. हा काय प्रकार मानायचा? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच…

भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. राफेल व्यवहारात एका मध्यस्थास काही कोटींची दलाली मिळाल्याचा स्फोट फ्रान्सच्या एका वृत्त संकेतस्थळाने केला आहे. म्हणजे राफेल प्रकरणात काहीतरी घोटाळा आहे हे राहुल गांधींचे म्हणणे बरोबर आहे. राफेल करारावर 2016 मध्ये सहय़ा झाल्यानंतर दसॉ या विमाननिर्मिती कंपनीने ‘डेफसिस सोल्युशन्स’ या हिंदुस्थानी मध्यस्थ कंपनीला 11 लाख युरो इतकी रक्कम ‘नजराणा’ म्हणून दिली, असे फ्रान्सच्या लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेने केलेल्या तपासात आढळल्याचे वृत्त ‘मीडिया पार्ट’ने दिले आहे. राफेल व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार किंवा दलाली प्रकरण घडले नसल्याचा निर्वाळा याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तो कोणाच्या सांगण्यावरून? राहुल गांधींनाच भाजपने तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता फ्रान्सच्या वृत्तपत्रांनीच राफेल घोटाळा उघड केला. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा कोणी द्यावा? की नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे? असा खोचक सवालही यातून विचारण्यात आला आहे.

Shiv Sena defends Deshmukh in recovery case, hits Opposition in Todays Saamana Editorial

‘सामना’तील मूळ अग्रलेखासाठी येथे क्लिक करा…

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती