विकासाचा दावा करणाऱ्या दिल्लीच्या आप सरकारने ना हॉस्पीटल उभारले ना फ्लाय ओव्हर, माहिती अधिकारातून केजरीवालांच्या दाव्याची पोलखोल


दिल्लीमध्ये विकासाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीने पोलखोल झाली आहे. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत दिल्ली सरकारने एकही हॉस्पीटल बनविले नाही की एकही फ्लायओव्हर उभारलेला नाही.AAP government in Delhi which claims development has neither built a hospital nor a flyover


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विकासाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीने पोलखोल झाली आहे. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत दिल्ली सरकारने एकही हॉस्पीटल बनविले नाही की एकही फ्लायओव्हर उभारलेला नाही.

दिल्लीतील आरोग्य सुविधांबाबत केजरीवाल सतत बोलत असतात. दिल्लीमध्ये २३ फ्लायओव्हर उभारले असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, हे दावे चुकीचे असल्याचे एका नागरिकाने माहिती अधिकाराचा वापर करून मिळविलेल्या माहितीत उघड झाले आहे.



तेजपाल सिंग यांनी २०१९ मध्ये याबाबत माहिती अधिकारात अर्ज केला होता. दिल्लीमधील आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांची माहिती त्यांनी मागितली होती. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकही नवे हॉस्पीटल पाच वर्षांत सुरू झालेले नाही.

आरोग्य विभागाच्या हॉस्पीटल सेलकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात एकही हॉस्पीटल नव्याने उभारलेले नाही, असे आरोग्य महासंचालक कार्यालयाने म्हटले आहे. केजरीवाल सरकारने २०१५ च्या निवडणूक जाहिरनाम्यात दिल्लीमध्ये हॉस्पीटल उभारून ४० हजार बेडची अतिरिक्त क्षमता वाढविली जाईल असे आश्वासन दिले होते.

मात्र, या काळात केवळ ४०० बेडची क्षमता दिल्ली सरकार करू शकली. केजरीवाल आपल्या मोहल्ला क्लिनिकचाही डिंडोरा पिटत असताना. परंतु, हा देखील जुमलाच असल्याचे उघड झाले आहे. आप सरकारने दिल्लीमध्ये एक हजार मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात १८९ मोहल्ला क्लिनिकच सुरू करण्यात आली आहेत.

दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांत एकही फ्लायओव्हर नव्याने उभारण्यात आलेला नाही. मात्र, केजरीवाल २३ फ्लायओव्हर उभारल्याचा दावा करत आहेत.

AAP government in Delhi which claims development has neither built a hospital nor a flyover

इतर बातम्या वाचा…

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात