“दिल्ली” आज उत्तर प्रदेशाच्या मोहिमेवर; मोदी सिद्धार्थनगर – वाराणसीत; केजरीवाल शरयूतीरी


वृत्तसंस्था

लखनऊ : “दिल्ली” आज उत्तर प्रदेशाच्या मोहीमेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिद्धार्थनगर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शरयू तीरावरच्या अयोध्येत आहेत. Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrives at Lucknow airport. He will be offering ‘aarti’ at Saryu Ghat, this evening.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिद्धार्थ नगरमध्ये आज नऊ मेडिकल कॉलेजची उद्घाटने करतील. त्यानंतर ते वाराणसी जाऊन प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत स्वास्थ योजनेचे उद्घाटन करतील. त्याच वेळी ते वाराणसीत सुमारे 5200 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करतील. अरविंद केजरीवाल हे दिवसा अयोध्येतील रामलल्लांचे दर्शन घेतील तर सायंकाळी ते शरयू आरती मध्ये सहभागी होतील.

उत्तर प्रदेश मोठे राज्य आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नेत्यांच्या राजकीय मोहिमा दीर्घ पल्ल्याच्या आणि दीर्घकाळ चालण्याच्या राहणार आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करण्यासाठी आवर्जून वेळ काढत आहेत. प्रियांका गांधी यांनी लखीमपुर सह उत्तर प्रदेशातील विविध कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न लावून धरले आहेत. अखिलेश यादव समाजवादी विजय यात्रेवर आहेत. तर अरविंद केजरीवाल आज प्रथमच अयोध्येच्या रूपाने उत्तर प्रदेशात राजकीय मोहिमेवर आले आहेत.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrives at Lucknow airport. He will be offering ‘aarti’ at Saryu Ghat, this evening.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात