विशेष प्रतिनिधी
लेह: भारत- चीन युध्दात १९६२ साली हुतात्मा झालेल्या सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वंदन केले. रेझांग लाच्या 1962 च्या युद्धाच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त नूतनीकरण केलेले युद्ध स्मारकाचं त्यांनी त्यांनी उद्घाटन केले. युध्दहिरो ब्रिगेडियर आर. व्ही. जटार यांना व्हिलचेअरवर बसवून त्यांनी उद्घाटनासाठी नेले.Defense Minister pays homage to China war martyrs, inaugurates war memorial with Brigadier in wheelchair
राजनाथ सिंह सध्या लेह दौºयावर आहेत. लेह येथे त्यांनी 13 कुमाऊँचे ब्रिगेडियर (निवृत्त) आरव्ही जटार यांची भेट घेतली. 1962 च्या भारत-चीन संघर्षात आर.व्ही. जटार यांनी धैयार्ने लढा दिला होता. ब्रिगेडियकर यांना स्वत: व्हील चेअरवर बसवून संरक्षणमंत्री त्यांच्यासोबत चालत गेले.
राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, रेजांग ला येथे १९६२ च्या लढाईत ११४ भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान केले. रेजांग लाचे युध्द जगातील दहा सर्वाधिक आव्हानात्मक संघर्षातील एक मानला जातो. हे ठिकाण १८ हजार फुट उंच आहे. अत्यंत विषम परिस्थितीत हे युध्द लढले गेले.
मेजर शैतानसिंह आणि त्यांच्या सहकाºयांनी शेवटची गोळी आणि अखेरचा श्वास असेपर्यंत युध्द करून बहादुरी आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला. या युध्दात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या स्मृतिनिमित्त नवीन युध्दस्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक रेजांग ला येथे सैनिकांनी दाखविलेल्या दृढ संकल्प आणि अतुलनिय साहसाचे उदाहरण आहे. ते केवळ इतिहासाच्या पानात अमर झाले नाहीत तर आमच्या ह्रदयातही जीवंत आहेत.
1962 च्या युद्धात मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखालील 13 कुमाऊंच्या सैन्याने चिनी सैन्याच्या अनेक सैनिकांना ठार केले होते. पूर्व लडाख क्षेत्रातील रेझांग ला वॉर मेमोरियल लहान होते आणि आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. पर्यटकांसह आता सर्वसामान्यांना स्मारक आणि सीमावर्ती भागात भेट देण्याची मुभा असेल. संरक्षण मंत्री चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह युद्ध स्मारकाचे उद्घाटन करतील.
18 नोव्हेंबर 1962 रोजी लष्कराच्या 13 कुमाऊ बटालियनच्या चार्ली कंपनीने लडाखमधील रेझांग ला खिंडीवर चिनी सैन्याच्या हल्याला प्रत्युत्तर दिले. या कंपनीतील जवळपास सर्व सैनिक दक्षिण हरियाणातील रहिवासी होते. या तुकडीत 120 सैनिक होते, ज्याचे नेतृत्व मेजर शैतान सिंग करत होते. या युद्धात एकूण 114 जवान शहीद झाले. हे जवान 18 नोव्हेंबर 1962 रोजी कडाक्याच्या थंडीत देशाच्या रक्षणासाठी लढले. त्यांची शस्त्रे जुनी होती आणि दारूगोळ्याचा कमी पडत होता.
थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे जास्च कपडे नव्हते आणि अन्नाचीही कमतरता होती. अशा प्रतिकूस परिस्थितीत ही भारताचे सौनीक लढत राहीले.चार्ली कंपनीने चीनला पुढे जाण्यापासून रोखलेच नाही तर चुशूल विमानतळ वाचवण्यातही ते यशस्वी झाले. रेझांग ला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात एकूण 1,300 चिनी सैनिक ठार केले गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App