पंजाबमध्ये पेट्रोल दहा तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त; मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार ; मुख्यमंत्री चन्नी


वृत्तसंस्था

चंदीगड : पंजाब राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज मध्यरात्रीपासून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे काँग्रेसची राजवट असलेले पंजाब हे राज्य पहिले ठरले आहे. decrease petrol and diesel prices by Rs 10 per litre and Rs 5 per litre, respectively in punjab

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे १० रुपये आणि ५ रुपये प्रति लिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी दिली. या बाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या अगोदर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राज्यानीही करात कपात करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले होते. भाजप शासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केली. त्यामुळे तेथील जनतेला दिलासा मिळाला. परंतु विरोधकांची राजवट असलेल्या राज्यात इंधनाच्या दरात कपात केलेली नाही. आमचं मात्र वेगळं, अशी अडेलतट्टू भूमिका घेतली. त्यात महाराष्ट्रातील ठाकरे- पवार सरकारचा समावेश होता.

अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरण, साखर कारखाना गैरव्यवहार, वाझे- वाझे आणि देशमुख वसुली प्रकरण, भूखंड गैरव्यवहार अशा महत्वाच्या प्रकरणात वसुली वसुली करण्यात ठाकरे – पवार सरकार गुंग आहे. त्यामुळे इंधन कपात करण्याचा व जनतेचा विचार करण्यास त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नसावा, अशी जनतेत चर्चा सुरु आहे. परंतु, पंजाबमध्ये शेतकरी आणि जनतेचा विचार करून मुख्यमंत्री चन्नी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे, हे मात्र खरे.

decrease petrol and diesel prices by Rs 10 per litre and Rs 5 per litre, respectively in punjab

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण