रुपयाचे मूल्य : डॉलरच्या तुलनेत घसरले पण पाऊंड, युरो, युआन, येनच्या तुलनेत वधारलेलेच!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 4.32 % ने घसरले हे खरे आहे, पण बाकीच्या बड्या देशांच्या चलनांच्या तुलनेत रुपया 6.21 % ने वधारलेलाच राहिला आहे, असे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया ब्रिटिश पाऊंड, युरोप मधला युरो, चीनचा युआन आणि जपानचा येन या चलनांच्या तुलनेत वधारताना दिसला आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थांच्या डळमळत्या परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेची पाळेमुळे घट्ट आहेत हेच स्पष्ट होताना दिसते आहे. Declined against the dollar but up against the pound, euro, yuan, yen !!

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणे आणि बाकीच्या चलनांच्या तुलनेत तो वधारणे असे क्वचितच घडते. परंतु त्यामुळे डॉलर खेरीज आपण अन्य चलनांमार्फत भारत जी आयात करतो त्याची चलनवाढ रोखण्याच्या दृष्टीने भारताला उपयोग होईल, असे अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एचडीएफसी बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट भास्कर पांडा आणि बँक ऑफ बरोडाचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस यांनी वरील मत व्यक्त केले आहे. रिझर्व बँकेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी घसरू शकला नाही. अन्यथा त्याचा परिणाम आयातीची चलनवाढीचा होण्यात झाला असता. परंतु रिझर्व बँकेच्या हस्तक्षेप करून हे टाळले, असे मदन सबनवीस यांनी स्पष्ट केले आहे.

डॉलर निर्देशांक सातत्याने वाढतो आहे. तो 100 च्यावर गेलाच होता. 104 पर्यंत पोहोचून तो खाली आला. त्यामुळे भारतीय चलनावर त्याचा परिणाम होणे स्वाभाविक होते. तसा तो झालाही पण रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपाने रुपया आणखी घसरणे टळू शकले, असे सबनवीस म्हणाले. शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.23 % ने घसरून 77.55 वरून 77.80 रुपयांपर्यंत खाली आला.

– भारताचा रुपया जपानी येनच्या तुलनेत

  • 6.21%. वधारला. ब्रिटिश पौंडाच्या तुलनेत 3.86% वधारला, तर युरोच्या तुलनेत 2.98% तसेच चिनी युआनच्या तुलनेत 0.68% नी वधारलेला दिसला.
  •  2022 मध्ये भारताची चीनकडून एकूण आयात $94.17 अब्ज डॉलर एवढी राहिली, तर निर्यात $21.25 अब्ज डॉलर एवढी राहिली.
  •  भारतातील जपान मधून आयात $14.4 अब्ज डॉलर्स, तर निर्यात $6.17 अब्ज डॉलर्स एवढी राहिली.
  •  संपूर्ण युरोपातून भारताची आयात $50.89 आमच्या डॉलर्स राहिली तर निर्यात $64.98 billion. अब्ज डॉलर्स राहिली.
  •  भारताकडे परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलर्स एवढा राहिले पाहिजे. त्यामुळे रुपया डॉलरचा विनिमय दर कितीही डळमळीत राहिला तरी त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न होता कामा नये, हे रिझर्व बँकेचे धोरण आहे.
  •  रिझर्व बँकेने वेळीच हस्तक्षेप करून रुपया डॉलर विनिमय दराची घसरण रोखली. त्याचबरोबर बाकीच्या बड्या देशांच्या चलनांच्या तुलनेत भारताचे रुपया चलन वधारले.

Declined against the dollar but up against the pound, euro, yuan, yen !!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात