नाशिक : राज्यसभेच्या सहाव्या जागे बाबत भाजपशी लढता लढता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातलाच संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेने आज आपले पत्ते खुले केले आहेत. पण त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा मनसुबा राखणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर पेच उभा राहिला आहे!! Sixth Rajya Sabha seat: Shiv Sena fighting with BJP – struggle within NCP
छत्रपती संभाजीराजे यांना सहाव्या जागेवरून राज्यसभेत निवडून द्यायचे असेल तर त्यांनी शिवसेनेची उमेदवारी द्यावी अन्यथा शिवसेनाच आपला दुसरा उमेदवार राज्यसभेवर पाठवेल, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
त्यातून अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना राज्यसभेत पाठविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसूब्याला शिवसेनेने खोडा घातला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेची लढाई भाजपशी लढतांना प्रत्यक्षात यानिमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातलाच राजकीय संघर्ष पुढे आला आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली. त्यात अनेक विषयात बरोबर राज्यसभेच्या विषय चर्चेला आल्याचे ते म्हणाले. पण त्यावेळी त्यांनी एक सूचक विधान केले. गेल्या वेळी राज्यसभेत राष्ट्रवादीने आपली एक जागा वाढवली होती. पुढच्या निवडणुकीत बाकीचे पक्ष आपापली जागा वाढवतील. शिवसेना घाट्यात आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही आमची जागा वाढवणार आहोत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या सहाव्या जागेसाठीचा संघर्ष उघड झाला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा मनसूबा जाहीर केला असला तरी त्यांचा राष्ट्रवादी कडे असलेला कल लपून राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी स्वतःचाच उमेदवार राज्यसभेत पाठवणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेनेही आपली भूमिका ताठर करत आपल्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचा चंग बांधलेला दिसतो आहे.
संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली तर ठीक. अन्यथा दुसरा उमेदवाराचा पर्याय शिवसेना स्वीकारणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट सूचित केले आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यसभेच्या सहाव्या जागेची लढत आता फक्त भाजप विरोधात न उरता त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या संघर्षाचा मोठा आयाम मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App