सर्व मुहूर्त इश्वराने तयार केले आहेत. ज्योतिषी काळ, घड्याळ आणि मुहूर्ताच्या नावावर फसवणूक करतात. कोणत्या ज्योतिषाने सांगितले होते की कोरोना येणार आहे असा सवाल योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. हीदेखील एक लाख कोटी रुपयांची इंडस्ट्री आहे, असेही त्यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
हरिद्वार : सर्व मुहूर्त इश्वराने तयार केले आहेत. ज्योतिषी काळ, घड्याळ आणि मुहूर्ताच्या नावावर फसवणूक करतात. कोणत्या ज्योतिषाने सांगितले होते की कोरोना येणार आहे असा सवाल योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. हीदेखील एक लाख कोटी रुपयांची इंडस्ट्री आहे, असेही त्यांनी सांगितले. Deception by astrologers in the name of MUHURT, which astrologer had said that Corona would come, the question of yoga guru Baba Ramdev
एका योगशिबिरात बोलताना बाबा रामदेव म्हणाले, बाबा रामदेव म्हणाले, कुठल्याही ज्योतिषाने कोरोना येणार, असे सांगितले नाव्हते आणि यानंतर ब्लॅक फंगस येणार, असेही कुणी बोलले नाही. बाबा रामदेव म्हणाले, कोरोनावर बाबा रामदेव औषध आणतील, असेही कुणी सांगितले नव्हते. ज्योतिषी बसल्या-बसल्याच नशीब सांगतात. मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या तेव्हा कुणालाही माहीत नव्हते.
इंग्रजी बोलणाऱ्यांना टोला लगावताना बाबा रामदेव म्हणाले, मी शुद्ध हिंदी आणि संस्कृत बोलतो. मधे-मधे इंग्रजी बोलणार्यानाही ठोकतो. कारण ते बोलत होते, की हिंदी आणि संस्कृत बोलणारे मोठे होऊ शकत नाहीत. आता हिंदी आणि संस्कृत बोलणाऱ्यानी असे झेंडे रोवले आहेत, की सर्वच जण म्हणत आहेत, हिंदी शिकायला हवे, संस्कृत शिकायला हवे. भविष्यात गुरुकुलात शिकणारे लोकच देश चालवतील. 20-25 वर्षांनंतर प्रयोग करून सांगेन.
अॅलोपॅथी उपचारपद्धतीसंदर्भात बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता. अॅलोपॅथी उपचार घेऊनही मृत्यू कसे होतात असा सवाल त्यांनी केला होता. मी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांच्या विरोधात नाही. आपली लढाई माफियांच्या विरोधात आहे. जे 2 रुपयांचं औषध 2 हजार आणि केव्हा केव्हा तर 10 हजार रुपयांना विकतात. गरज नसतानाही शस्त्रक्रिया करतात.
अनेकदा तर औषधांचा अधिक मारा केल्यानं काय परिणाम होतात हे तर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्याकडूनही आपण ऐकल्याचे बाबा रामदेव म्हणाले होते. मी स्वत: मेडिकल सायन्सचा आदर करतो. असं म्हणत असतानाच आयुवेर्दामुळंही अनेक जीवघेणे आणि दुर्धर आजार बरे होत असल्याचा दाखला त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App