Cyber security breach : भारताची सायबर सुरक्षा भेदली, फितूर लष्करी अधिकाऱ्यांचा शोध सुरू


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – भारताच्या सायबर सुरक्षाव्यवस्था भेदण्यात आली आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयात अतिवरिष्ठ पातळीवरून फितूर लष्करी अधिकाऱ्यांचा शोध सुरू असून याबाबतचा तपास सुरू झाला आहे. भारतीय संरक्षण व्यवस्थेची संवेदनशील माहिती भारताच्या शत्रू देशांना पुरविण्याचा हा मामला व्हॉट्स ऍप सारख्या सोशल मीडिया माध्यमातून समोर आला आहे. Cyber security breach by military officials on WhatsApp unearthed, high-level probe underway



काही वरिष्ठ अधिकारी व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून शत्रू देशांच्या संपर्कात आले आणि त्यांनी काही विशिष्ट अमिषाला भुलून भारताच्या संरक्षण विषयक तयारीची संवेदनशील माहिती शत्रू पुरविली, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरू केली आहे. पण या चौकशीचे तपशील जाहीर करता येणार नाहीत, असे मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी भारतातल्या काही वेबसाइट्स हॅक करण्यात आल्या होत्या. काही वेळातच या वेबसाइट्स रिस्टोअर देखील करण्यात आल्या. हे नियमितपणे घडत होते. या पार्श्वभूमीवर लष्करातील फितूर अधिकारी कोण, त्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती, याचा शोध घेतला जात आहे.

Cyber security breach by military officials on WhatsApp unearthed, high-level probe underway

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात