कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक, चीनने २० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल केले कौतुक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सीमावादावरून भारतासोबत कुरापती काढत २० जवानांना चीनने शहीद केले. संपूर्ण देशात चीनबद्दल संताप आहे. मात्र, भारतातील कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक आहे. चीनने लसीकरणाचा २० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने चीनचे कौतुक केले आहे.CPI-M lauds China for 20 crore vaccination as India administers record 1 cr jabs

भारतानेही शुक्रवारी कोरोना प्रतिबंधक लसीच्या देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत एकाच दिवसात एक कोटीहून अधिक लस देऊन मैलाचा दगड गाठला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वच पक्षांनीपक्षाच्या मयार्दा ओलांडून या महत्त्वपूर्ण कामगिरीचे स्वागत केले होते. मायक्रॉसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस यांनीही जबरदस्त कामगिरी म्हणत भारताचे कौतुक केले होते. मात्र, कम्युनिस्टांना भारतापेक्षाही चीनची कामगिरी अधिक सरस वाटत आहे.



तामीळनाडू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इन्फाग्राफीक्सही एक ट्विट केले आहे. त्यामध्ये चीनच्या लसीकरण मोहीमेची माहिती देऊन म्हटले आहे की चीनने लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठला असून आत्तापर्यंत २० कोटी नागरिकांना लस दिली आहे. धक्कादायक म्हणजे या ट्विटमध्ये त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे छायाचित्रही होते.

गेल्या महिन्यातही सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी कोरोना महामारीचा यशस्वी मुकाबला केल्याबद्दल चीनचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर शांततापूर्ण परराष्ट्र धोरण अवलंबल्याबद्दल बीजिंगचे कौतुक केले.
येचुरी आणि कम्युनिस्ट पक्षाचे इतर नेते चीन चीनी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित आभासी कार्यक्रमात भाग घेतला होता. येचुरी आणि डी. राजा यांच्याव्यतिरिक्त, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार आणि अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकच्या केंद्रीय समितीचे सचिव जी देवराजन या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावर आपला बचाव करताना कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणाले होते की सरकार स्वत:च अनेक मुद्यांवर चीनच्या सोबत आहे. मोदी सरकारच्या मोदी सरकारच्या अपयशांपासून लक्ष हटवण्यासाठी भाजप अशा प्रकारचे आरोप करत आहे.

कम्युनिस्टांनी १९६२ मध्ये भारत-चीन युध्दादरम्यानही भारतविरोधी भूमिका घेतली होती. पंडीत नेहरू यांना चीनविरुध्दच्या युध्दात पाठिंबा देण्यास नकार दिला होता. वर्गशत्रूंचे हित जपºयासाठी हे युध्द केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. कम्युनिस्ट पक्षामध्ये फुट पडण्याचे मुख्य कारणही ते होते.

CPI-M lauds China for 20 crore vaccination as India administers record 1 cr jabs

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात