कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्यात कोव्हॅक्सिनला मोदी लस म्हणून लसीकरण नाकारणाऱ्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १६ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४५ वर्षांवरील असल्याने शक्य असतानाही यापैकी कोणीही लसीकरण करून घेतले नव्हते.Covaxin is Modi vaccine therefore refuses vaccination , 16 Aligarh Muslim University professors killed by corona
विशे प्रतिनिधी
अलीगढ : कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्यात कोव्हॅक्सिनला मोदी लस म्हणून लसीकरण नाकारणाऱ्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १६ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४५ वर्षांवरील असल्याने शक्य असतानाही यापैकी कोणीही लसीकरण करून घेतले नव्हते.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना प्रतिबंधक लसीला मोदी लस म्हणून हिणवले होते. त्यामुळे १८ पैकी केवळ दोनच प्राध्यापकांनी लसीकरण करून घेतले होते.
जवाहरलाल नेहरू मेडीकल कॉलेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १८ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील केवळ दोन जणांची लसीकरण करून घेतले होते. ते देखील आठवड्यापूर्वीच केले होते.
रमजानच्या महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन या सर्व प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. रमजनामधील उपवास, निष्काळजीपणा यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या प्राध्यापकांनी रुग्णालयात भरती होण्याऐवजी घरीच उपचार घेणे पसंद केले होते.
या प्राध्यापकांनी सुरूवातील चाचणी करून घेण्यासही नकार दिला होता. कोरोना प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यावरही त्यांनी केवळ पॅरासिटॅमॉलसारख्या औषधांवर भरवसा ठेवला. डॉक्टरांकडून उपचार करून घेतले नाही.
विशेष म्हणजे अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या आवारातच जवाहरलाला नेहरू मेडीकल कॉलेज आहे. याठिकाणी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्या सुरू होत्या आणि अद्यापही सुरू आहेत.
त्यामुळे प्राध्यापकांना लस मिळणे सहज शक्य होते.जवाहरलाल नेहरू मेडीकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या सर्व प्राध्यापकांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या इतर व्याधी होत्या.लसीकरण करून घेतले नसल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App