कोरोनाच्या मदतीतही कॉँग्रेसचे राजकारण, परदेशांची कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी भारताच्या आत्मनिर्भरतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह


देशावर कोरोनाचे प्रचंड मोठे संकट आले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. या परिस्थितीत मानवतेच्या भावनेतून भारताला अनेक देश मदत करत आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कॉँग्रेस मदतीतही राजकारण करत आहे. या मदतीवरून भारताच्या आत्मनिर्भरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.Corona’s help also casts doubt on Congress politics, India’s self-reliance instead of expressing gratitude to foreigners


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे प्रचंड मोठे संकट आले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. या परिस्थितीत मानवतेच्या भावनेतून भारताला अनेक देश मदत करत आहेत.

त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कॉँग्रेस मदतीतही राजकारण करत आहे. या मदतीवरून भारताच्या आत्मनिर्भरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.कॉँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे



की २००४ मध्ये त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी परदेशांकडून मदत घेण्यास नकार दिला होता. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून काल परदेशी मदत स्वीकारण्याचा निर्णय घेतला. काल आपण आत्मनिर्भर होते आपण परदेशी मदतीवर अवलंबून का राहायला लागलो.

देशावर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात वैद्यकीय साधनांची कमतरता भासत आहे. सुमारे १३० कोटी लोकसंख्येच्या देशात एकाच वेळी साधनसामुग्री गोळा करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक देश भारताला मदत करत आहेत.

याचे कारण म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने अमेरिकेपासून अनेक देशांना मदत केली होती. हायड्रोक्लोरोक्विन गोळ्यांपासून ते अनेक वैद्यकीय साहित्य पुरविले होते. त्याचीच कृतज्ञता म्हणून अनेक देशांनी भारताला आताच्या काळात मदत सुरू केली.

इंग्लडचे राजपूत्र प्रिन्स चार्ल्स यांनीही काल याचा पुनरुच्चार करताना म्हटले होते की भारताने संपूर्ण जगाला पहिल्या लाटेत मदत केली होती. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे की आपण भारताला मदत करावी. मात्र, प्रत्येक गोष्टीमध्ये मोदी सरकारविरुध्द बोलण्यास काहीतरी शोधणाऱ्या कॉंग्रेसने मदतीचेही राजकारण सुरू केले आहे.

Corona’s help also casts doubt on Congress politics, India’s self-reliance instead of expressing gratitude to foreigners

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात