जयपुरात कोरोनाची लसच गेली चोरीला, सरकारी रुग्णालयातून कोव्हॅक्सिनच्या ३२० डोसवर डल्ला, गुन्हा दाखल

Corona vaccine stolen in Jaipur, 320 doses of covaxin Stolen from government hospital, case registered

Corona vaccine stolen in Jaipur : कोरोनाने देशात पुन्हा एकदा भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. कोरोनाविरुद्ध लस ही अत्यंत प्रभावी उपाय म्हणून पाहिले जाते, परंतु आता या लसीवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची बातमी समोर आली आहे. Corona vaccine stolen in Jaipur, 320 doses of covaxin Stolen from government hospital, case registered


विशेष प्रतिनिधी

जयपूर : कोरोनाने देशात पुन्हा एकदा भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. कोरोनाविरुद्ध लस ही अत्यंत प्रभावी उपाय म्हणून पाहिले जाते, परंतु आता या लसीवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची बातमी समोर आली आहे.

जयपूरच्या कवंतिया येथील शासकीय रुग्णालयातून लस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्ड स्टोअरेजपासून लस केंद्रापर्यंत नेण्यात आलेल्या कोरोनाचे 320 डोस चोरीला गेले आहेत.

कोव्हॅक्सिनच्या एका व्हायलमध्ये दहा डोस असतात. मुख्य वैद्यकीय अधिकारी नरोत्तम शर्मा यांच्या सूचनेवरून जयपूर येथील कवंतिया रुग्णालयाच्या अधीक्षकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही चोरी अशा वेळेस झाली जेव्हा जयपूरमध्ये कोरोनाची लस संपली आहे आणि अनेक लसीकरण केंद्रांवर काम थांबविण्यात आले आहे.

पोलिसांनी भादंवि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 12 एप्रिल रोजी जयपूरच्या कोवंतिया हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिनचे डोस आले, त्याच दिवशी जेव्हा रुग्णालयाने स्टॉक तपासला तेव्हा त्यामध्ये 320 डोस कमी आढळले. या घटनेनंतर रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

हे लक्षात आल्यावर रुग्णालय समितीने दोन दिवस तपास केला पण काहीही शोध लागला नाही. यानंतर रुग्णालय प्रशासनाने बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. राजस्थानमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 जण मरण पावले आहेत.

Corona vaccine stolen in Jaipur, 320 doses of covaxin Stolen from government hospital, case registered

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात