निष्काळजीपणा : बुलडाण्यात तेराव्याचे गोड जेवण ठरले ‘कडू’, सहभागी झालेल्यांपैकी ९३ जणांना कोरोनाची लागण

Corona In Maharashtra 93 people Test Covid Positive After Feast In Buldhanas pota Village

Corona In Maharashtra : राज्यात कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातलेले असताना वारंवार खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील निर्बंधांबरोबरच राज्य पातळीवरूनही नियमावलीच्या काटेकोर पालनाबाबत सातत्याने सांगितले जात आहे. परंतु तरीही याकडे सर्रास कानाडोळा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरूच आहे. आता बुलडाण्यातील एका गावात तेराव्याच्या गोड जेवणाचे निमंत्रण महागात पडले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 93 जणांना कोरोनाने गाठल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. Corona In Maharashtra 93 people Test Covid Positive After Feast In Buldhanas pota Village


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : राज्यात कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातलेले असताना वारंवार खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील निर्बंधांबरोबरच राज्य पातळीवरूनही नियमावलीच्या काटेकोर पालनाबाबत सातत्याने सांगितले जात आहे. परंतु तरीही याकडे सर्रास कानाडोळा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरूच आहे. आता बुलडाण्यातील एका गावात तेराव्याच्या गोड जेवणाचे निमंत्रण महागात पडले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 93 जणांना कोरोनाने गाठल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांना कोरोना नियमावलीबद्दलचा निष्काळजीपणा महागात पडल्याचे समोर आले आहे.

93 जणांना कोरोनाची लागण

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यातील पोटा गावात आतापर्यंत 93 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी 700 हून अधिक लोकसंख्या असलेले पोटा हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या तपासणी शिबिरात 15 ग्रामस्थ संसर्गित झाल्याचे आढळले. काही दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दुसर्‍या शिबिरात 78 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यातील एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

संसर्ग होण्यापूर्वी पोटा गावातील काही जण तेराव्याच्या जेवणाला गेले होते, यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु स्थानिकांच्या मते हाच कार्यक्रम कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरला आहे. खामगावमध्ये कोरोनाने ग्रस्त रुग्णाच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावी पोटामध्ये तेराव्याचे गोड जेवण आयोजित करण्यात आले होते. एका गावकऱ्याने सांगितले की, या जेवणाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यातीलच अनेकांना आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शिबिरे आयोजित करून अधिकाधिक लोकांची तपासणी केली जात आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, लक्षणे असलेले रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहेत आणि लक्षणे नसलेल्यांना घरी विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

Corona In Maharashtra 93 people Test Covid Positive After Feast In Buldhanas pota Village

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात