Corona Updates In India : भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे ३२९३ मृत्यू, ३.६० लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद

Corona outbreak india todays corona cases records low live updates

Corona Updates In India : देशात कोरोना महामारीमुळे दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी 3 लाख 60 हजार 960 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 3293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वाढलेल्या संख्येमुळे मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी 3.23 लाख रुग्ण आढळले होते, परंतु रात्री 12 वाजेपर्यंत हा आकडा 3.60 लाखांवर पोहोचला होता. यापूर्वी सोमवारी 3.52 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती, तर 2800 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. Corona Updates In India 3285 deaths, 3.62 lakh new cases due to corona in India in a single day


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीमुळे दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी 3 लाख 60 हजार 960 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 3293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वाढलेल्या संख्येमुळे मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी 3.23 लाख रुग्ण आढळले होते, परंतु रात्री 12 वाजेपर्यंत हा आकडा 3.60 लाखांवर पोहोचला होता. यापूर्वी सोमवारी 3.52 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती, तर 2800 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.

देशातील एकूण बाधितांची संख्या वाढून 1,79,88,637 वर गेली आहे, तर देशातील बरे होण्याा दर घटून 82.54 टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,01,165 वर गेली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. ही संख्या वाढून 29,72,106 झाली आहे. एकूण संसर्ग झालेल्यांपैकी हे प्रमाण 16.34 टक्के आहे. त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर कोरोनातून बरे होण्याचा दर 82.54 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,48,07,704 झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

काल देशात 24 तासांत 2771 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 895, दिल्लीत 381, उत्तर प्रदेशात 264, छत्तीसगडमध्ये 246, कर्नाटकमधील 180, गुजरातमधील 170 आणि झारखंडमधील 131 रुग्णांचा समावेश होता.

आतापर्यंत 2,01,165 जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत 2,01,165 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी महाराष्ट्रात 66,179 रुग्णांचा, दिल्लीत 15009, कर्नाटकात 14,807, तामिळनाडूमध्ये 13,728, उत्तर प्रदेशात 11,678, पश्चिम बंगालमध्ये 11,082, पंजाबमध्ये 8,630, आंध्र प्रदेशात 7,800 आणि छत्तीसगडमध्ये 7782 रुग्णांचा मृत्यू झाला.

दहा राज्यांत 69 टक्के रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोनाचे एका दिवसात जेवढे रुग्ण आढळले त्यातील 69.1 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसहित दहा राज्यांतील आहेत. कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा त्या दहा राज्यांत समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले की, आतापर्यंत 28 कोटींपेक्षा जास्त टेस्ट झाल्या आहेत.

Corona Updates In India 3285 deaths, 3.62 lakh new cases due to corona in India in a single day

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात