वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी स्वस्त आणि प्रभावी अशा कोरोना अॅण्टीजन चाचणी कीटची निर्मिती केली आहे. या कीटची किंमत फक्त ५० रुपये आहे. हे किट शंभर टक्के स्वदेशी आहे. Corona test kit for only Rs. 50; Developed by Researchers of IIT Delhi
आयआयटी दिल्लीतील संशोधकांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचणी कीट बनवले होते. त्याची किंमत ३९९ रुपये होती. त्यामुळे ‘आरटीपीसीआर’ चाचणी स्वस्त झाली होती.
आयआयटी दिल्लीतील सेंटर फॉर बायोमेडिकल इंजिननिअरिंगमधील (सीबीएमई) प्रा. हरपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून चाचणी कीटची निर्मिती केली. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते या कीटचे लाँचिंग केले गेले. या कीटसाठी संस्थेमध्येच उपलब्ध साधनांचा वापर केला गेला आहे.
या स्वदेशी बनावटीच्या अॅण्टीजन कीटच्या सहाय्याने ग्रामीण भागांमधील लोकांच्या अधिकाधिक चाचण्या करणे शक्य होणार आहे. या कीटद्वारे केलेल्या चाचण्या ९९ टक्के अचूक असल्याचे दिसले आहे. ‘आयसीएमआर’नेही या कीटला मान्यता दिली आहे. आयआयटी दिल्लीने या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App