वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारतात मे महिन्यात कोरोनाचे संकट महाभयानक रूप प्राप्त करेल. त्याचे परिणाम अतिशय घातक असतील, दिवसा 5 हजारांवर लोकांचा बळी कोरोनाने जाईल, असा गंभीर इशारा अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) दिला आहे. Corona famine in May 5,000 victims a day american university
तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात कोरोना मृतांची संख्या शिखरावर पोचण्याचा अंदाज आहे. तसेच परिस्थिती गंभीर होण्याचा इशारा दिला आहे.
कोरोनामुळे काही शहरात आताच भीषण चित्र निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. याच दरम्यान पुन्हा धडकी भरवणारी ही माहिती समोर आली आहे,
भारतात 10 मे रोजी 5 हजार 600 जणांचा कोरोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या कालावधीत देशात 3 लाख 29 हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावाही केला आहे.
देशात सध्या कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आहे. रुग्णसंख्येने अमेरिकेचेही रेकॉर्ड मोडले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App