काय शिजतंय? शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात जवळपास १ तास बंद खोलीत बैठक चालली. त्यामुळे शरद पवार काहीतरी शिजवताहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.cooking Sharad Pawar-Prashant Kishor discussion in a closed room for an hour


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात जवळपास १ तास बंद खोलीत बैठक चालली. त्यामुळे शरद पवार काहीतरी शिजवताहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. आतापर्यंतची ही तिसरी भेट आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची आणि काही मान्यवरांची मंगळवारी जवळपास अडीच बैठक झाली. या बैठकीनंतर पुन्हा प्रशांत किशोर हे शरद पवारांना भेटले.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशांत किशोर यांनी यापूर्वी ११ जूनला शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी सोमवारी शरद पवारांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली होती.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी ८ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पण ही राजकीय बैठक नव्हती, असं राष्ट्र मंचाकडून सांगण्यात आलं.

शरद पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, समाजवादी पाटीर्चे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी, आपचे सुशील गुप्ता, भाकपचे बिनॉय विश्वम, माकपचे निलोत्पल बसु आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्यासह इतरही प्रमुख नेते उपस्थित होते. तसंच गीतकार जावेद अख्तर, माजी राजदूत के. सी. सिंह आणि माजी न्यायमूर्ती ए. पी. शहा हे उपस्थित होते.

cooking Sharad Pawar-Prashant Kishor discussion in a closed room for an hour