डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर योगगुरू रामदेवबाबांकडून वादग्रस्त विधान मागे

योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद वाढत चालला होता. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहून वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले होते. योगगुरु रामदेव यांनी ट्विट करून आपण केलेलं वक्तव्य मागे घेत घेतले आहे.Controversial statement from yoga guru Ramdev Baba backed after Harshvardhan’s letter


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद वाढत चालला होता. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहून वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले होते.

योगगुरु रामदेव यांनी ट्विट करून आपण केलेलं वक्तव्य मागे घेत घेतले आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात स्पष्टपणे सांगितले होते की, अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे.



आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. करोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण करोना योद्ध्यांचा अपमान केल्याने खूप दु:ख झालंय.

आपण जे स्पष्टीकरण दिलंय तेवढ्याने वेदना, दु:ख शमणार नाही. अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धती ही दिवाळखोरी असल्याचं म्हणणं लाजीरवाणं आहे. करोनामुक्त होऊन अनेक नागरिक घरी जात आहेत.

करोनाने होणारा मृत्यू दर हा १.१३ टक्के आणि करोनामुक्त होण्याचा दर ८८ टक्के इतका अधिक आहे. यामागे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचे बहुमूल्य योगदान आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला होता.

त्यांच्या या विधानामुळे डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉक्टरांची देशपातळीवर संघटना असलेल्या इंडियान मेडीकल असोसिएशनने (आयएमए) आक्रमक पवित्रा घेतला होता.

Controversial statement from yoga guru Ramdev Baba backed after Harshvardhan’s letter

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात