विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना गाढव संबोधल्याबद्दल काँग्रेसच्या तेलंगण शाखेचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी माफी मागितली आहे. थरुर यांनीही त्यांची माफी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.Contoveral remarks about Shashi Tharoor withdrawn back
थरुर म्हणाले की, रेवंथ यांनी मला दूरध्वनी केला. ते अत्यंत अदबीने बोलले. जे काही बोललो त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मी ती स्वीकारली असून हे दुर्दैवी प्रकरण बाजूला ठेवून पुढे वाटचाल करण्याची माझी इच्छा आहे.
वास्तविक रेवंथ यांनी प्रारंभी या वक्तव्याचा इन्कार केला होता. रामाराव हे खोटे बोलत असून खोट्या बातम्या पसरवीत असल्याचा दावाही त्यांनी केला होता.तेलंगणमधील सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचे थरुर यांनी कौतुक केले होते
त्यामुळे रेवंथ यांनी त्यांच्याविरुद्ध अनुचित उद्गार काढले होते. रेवंथ यांनी ट्विट केले. त्यांनी म्हटले की, हे वक्तव्य मागे घेत असल्याचे थरुर यांना मी कळविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App