काँग्रेस नुसतीच करणार चर्चा, अध्यक्ष निवडण्याचे धाडस अजून नाहीच


कॉंग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक शनिवारी होत आहे. मात्र बैठकीच्या आधीच 23 जणांच्या गटासह अनेक काँग्रेस नेत्यांनी, ज्यांनी यापूर्वी पक्षाच्या रचनेत व्यापक बदल करण्याची मागणी केली होती, त्यांनी असा युक्तिवाद केला की पक्षाने आताच निवडणुका घेऊ नयेत. त्या ऐवजी येत्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे. यामुळे पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याचे धाडस अजूनही दाखवण्यास कॉंग्रेस नेते तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. Congress Working Committee meets today, leaders argued that the party should not go in for polls now and should focus on the forthcoming Assembly elections in five states.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) पहिली बैठक पाच महिन्यानंतर शनिवारी होणार आहे. मात्र या बैठकीत देखील पक्षाच्या अध्यक्षपदासह अन्य संघटनात्मक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. कारण या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच ज्या 23 जणांच्या गटाने पक्षाच्या रचनेत व्यापक बदल करण्याची मागणी केली होती त्यांनीच असा युक्तिवाद केला की पक्षाने आता निवडणुकीच्या फंदात पडू नये. त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे.

जी-23 नेत्यांनी असेही सूचित केले की जर हायकमांडने देशातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पुन्हा एकदा संघटनात्मक निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तर ते विरोध करणार नाहीत. सीडब्ल्यूसीच्या अनेक सदस्यांनी सोनिया गांधी यांना अंतरिम अध्यक्ष म्हणून काम चालू ठेवण्यास अनुकूलता दर्शवली. यामुळे राहुल किंवा प्रियंका गांधी हे अजूनही पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

“काही राज्यांमध्ये 2024 पर्यंत एकेक करुन सतत निवडणुका होत राहतील. त्यामुळे या निवडणुका जिंकणे किंवा आपली स्थिती मजबूत करणे याला पक्षाची प्राथमिकता असली पाहिजे. पक्षापुढे आव्हाने आहेत आणि राष्ट्रापुढेही मोठी आव्हाने आहेत. लोकशाही मूल्यांचे प्रश्न आहेत, कमकुवत घटकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे. अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. या सर्व गोष्टी काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. मला वाटते की आपण या मुद्द्यांवर आणि राज्यांमध्ये निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण तरीही, जर पक्षाला वाटत असेल की पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात, तर आम्हीही निवडणुकीसाठी तयार आहोत,” असे सीडब्ल्यूसी सदस्य हरीश रावत यांनी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. जी-23 च्या काही नेत्यांनी मात्र असे म्हटले आहे की, संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीडब्ल्यूसी सदस्यत्व मोहीम आयोजित करण्याची वेळ ठरवता येऊ शकते, असेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.



दरम्यान कॉंग्रेसने गेल्या पाच-सहा वर्षांपासून सदस्यत्व नोंदणीसाठी मोहीम राबवलेली नाही. मग अशावेळी संघटनात्मक निवडणुका कशा घेऊ शकतो? आधी सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करुन घ्यावी लागेल. पण येत्या विधानसभा निवडणुकांनाही प्राधान्य द्यावे लागेल. संघटनात्मक निवडणुकीच्या वेळापत्रकावर बैठकीत चर्चा करू शकतो. परंतु त्या आधी प्रथम सदस्यत्व मोहिमेला कधीतरी सुरुवात करावी लागेल, असा मतप्रवाह कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.

“अभी कौन संभालेगा? जब तक मॅडम है, गाडी चलेगा. गाडी चलता रहेगा. मॅडम छोड देगी, तो गडी भी चलना बंड हो जाएगी. इसमय अफ्रताफ्री का माहौल है हर राज्य में,” अशी स्थिती एका कॉंग्रेस नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर बोलून दाखवली. सोनिया गांधींवर प्रत्येकाचा विश्वास आहे. ती एकसंध शक्ती आहे, असे गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. नवीन अध्यक्ष निवडण्याचा प्रश्न आत्ताच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आजच्या कॉंग्रेस बैठकीत दोन ठराव स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. ज्यात चार जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा विषय येऊ शकतो. मात्र आजच्या बैठकीतून काय साध्य होईल या संदर्भातही अनेकांना शंका आहे. प्रत्येकजण केवळ सोनिया, राहुल आणि प्रियंका यांना प्रभावित करण्यासाठी उत्सूक असेल. एकमेकांचे अहंकार गोंजारले जातील पण अंतिमतः पक्षहितासाठी हे सगळे निरर्थक असेल अशीही टीप्पणी एकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर केली. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालातील पराभवावर अद्याप सीडब्ल्यूसी समितीचे म्हणणे पक्षासमोर आलेले नाही. त्याशिवायच पुढील निवडणुकींची चर्चा करणे कितपत योग्य असा प्रश्न एकाने उपस्थित केला.

2 वर्षे अनिश्चितता

राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन दोन वर्षे झाली आणि थकलेल्या, आजारी असणाऱ्या सोनिया गांधी यांच्यावरच पुन्हा अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली. राहुल गांधी पक्षाचे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहेत का यावर पक्षात मोठी दुफळी आहे. राहुल यांच्या आडून पक्षावर वर्चस्व ठेवण्यासाठी उत्सूक असलेला एक गट त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करतो आहे मात्र स्वतः राहुल गांधीच त्यास प्रतिसाद देत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.

Congress Working Committee meets today, leaders argued that the party should not go in for polls now and should focus on the forthcoming Assembly elections in five states.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात