विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राममंदिरासाठीच्या देणग्यांमधून फायदा उकळला जात असून हा रामद्रोह आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. कॉंग्रेसने हा मुद्दा सध्या लावून धरण्याचे निश्चित केल आहे. त्यामुळे पक्षाकडून रोज या विषयावर भाष्य केले जात आहे.Congress targets BJP on Ram Temple
काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले, अयोध्येतील जमीन खरेदी व्यवहारातील दीपनारायण हा भाजपचा नेता असून पक्षाच्या ‘आयटी सेल’शी संबंधित आहे. अयोध्येचे भाजपचे महापौर ऋषीकेश उपाध्याय यांचा दीपनारायण भाचा असून त्याने २० फेब्रुवारी २०२१ रोजी अयोध्येत हवेली अवध नावाने ८९० चौरसमीटर जमीन २० लाखात खरेदी केली.
या जमिनीचा खरेदीदर २२४७ रुपये चौरसमीटर असून तर ‘सेलडीड’नुसार या जमिनीचा सरकारी दर ४००० रुपये प्रति चौरसमीटर आहे. अवघ्या ७९ दिवसात दीपनारायणने ही जमीन अडीच कोटी रुपयांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रासाठी चंपतराय यांना विकली.
म्हणजेच जमिनीच्या खरेदीचा दर २८०९० रुपये प्रती चौरसमीटर झाला. सुमारे ७९ दिवसांत जमिनीची किंमत १२५० टक्क्यांनी वाढली. दररोज ३ लाख रुपयाने दर वाढत गेला. हा गैरव्यवहार नाही तर काय आहे, असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App