चीनची लसीकरणातही आघाडी, एक अब्ज डोसचा टप्पा केला पार


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीनने लसीकरणात मोठी मजल मारली आहे. चीनमध्ये आतापर्यत एक अब्ज जोस दिले आहेत. कोणत्याही देशापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. चीनने महिन्याच्या अखेरपर्यंत १.४ अब्ज म्हणजे ४० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.China gave one billion doses

चीन यंदा तीन अब्जाहून जास्त डोसचे उत्पादन करण्याची अपेक्षा असल्याचे वृत्त झिन्हुआ वृत्तसंस्थेने एप्रिल महिन्यात दिले. सामुहिक प्रतिकारशक्ती केव्हा निर्माण होणार किंवा किती टक्के डोस परदेशी विकले जाणार याबाबत चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही.



चीनच्या प्रसिद्ध ग्वांगझू शहरात डेल्टा या जास्त संसर्गक्षम विषाणूचा प्रसार झाला. त्यामुळे अनेकांना लस घेण्याबाबत खडबडून जागे होण्याचा इशारा मिळाला आहे. रविवारी चीनमध्ये नव्या २३ रुग्णांची नोंद झाली.

कोरोनाच्या साथीवर लवकर नियंत्रण मिळविल्यामुळे चीनमधील नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा लोकसंख्या जगात सर्वाधिक असूनही मर्यादित राहिला आहे. त्यामुळे लसीकरण तातडीने सुरु करण्याची गरजच उरली नव्हती. परिणामी लसीकरण इतर काही प्रमुख देशांच्या तुलनेत संथ गतीने सुरु झाले. किती टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले हे मात्र स्पष्ट नाही.

China gave one billion doses

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात