शशी थरूर यांच्या जाहीरनाम्यात गंभीर चूक जम्मू-काश्मीरच्या नकाशाचे ‘डिस्टॉर्शन’!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेले खासदार शशी थरूर यांची सुरुवातीलाच एक गंभीर चूक घडली आहे. शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या मतदारांसाठी काढलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी जम्मू-काश्मीरच्या नकाशाचे “डिस्टॉर्शन” केले आहे. त्या नकाशातून जम्मू काश्मीरचा पाकिस्तान व्याप्त भाग उडवून लावून भारताच्या अधिकृत भूमिकेला हरताळ फासला आहे. Congress presidential candidate Shashi Tharoor’s manifesto for the election shows a distorted map of India

भारताच्या अधिकृत नकाशामध्ये जम्मू-काश्मीरच्या पाकव्याप्त भागाचा समावेश असतो. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अधिकृत भाग आहे. पाकिस्तान गिलगिट – बाल्टिस्तानचा हा भाग बळकावला आहे. शशी थरूर यांनी जाहीरनाम्यात छापलेल्या नकाशात या भागाचा समावेशच केलेला नाही जो करणे भारतीय संसदेच्या ठरावानुसार आवश्यक आहे.

म्हणजेच शशी थरूर यांच्या जाहीरनाम्यातला भारताचा नकाशा डिस्टॉर्ट केलेला दिसतो आहे. संघटनेचे विकेंद्रीकरण नावाखाली छापलेल्या या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरचा भाग थरूर यांनी वगळून पाकिस्तानला देऊन टाकला आहे. या विषयावर आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात थरूर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Congress presidential candidate Shashi Tharoor’s manifesto for the election shows a distorted map of India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात