वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता वादात सापडली आहे. गांधी कुटुंब आणि बंडखोर जी-23 गटाचा पाठिंबा असलेले अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचाराचा शुभारंभ करताना प्रतिस्पर्धी शशी थरूर यांच्यावर टीका केली.Congress President Election Shashi Tharoor’s proposal of consensus candidate rejected, Mallikarjun Kharge’s criticism
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वसहमतीने उमेदवार असता तर बरे झाले असते, असे शशी थरूर यांना म्हणालो होतो. परंतु त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. आता माघार घेऊ शकत नाही, अन्यथा पाठिंबा देणाऱ्यांचा विश्वासघात केल्यासारखे होईल. लोकशाहीत दृष्टीने निवडणूक झाली पाहिजे असे थरूर यांचे म्हणणे पडले, असे खरगे म्हणाले.
रविवारी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थरूर यांना फोन केला होता. त्या वेळी सहमतीने उमेदवार निवडण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, परंतु त्यांनी तो नाकारला. आता एखाद्याने निवडणूक लढवण्याचा निश्चय केला असेल तर त्याला कोण थांबवू शकतो? थरूर मला धाकट्या भावासारखे आहेत. हा आमच्या कुटुंबातील प्रश्न आहे, असे खरगे म्हणाले.
खरगे हे गांधी कुटुंबाचेच उमेदवार असल्याचे सांगितले जाते. परंतु खरगेंनी हे नाकारले. गांधी कुटुंबीय आणि ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून त्यांच्या चांगल्या सूचनांवर अंमलबजावणी करू. त्याचबरोबर आता बंडखोरांचा जी-23 वगैरे गट उरला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अध्यक्षपद उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8 ऑक्टोबर असून 17 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
तीन पक्ष प्रवक्त्यांचे राजीनामे
अध्यक्षपद निवडणूक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी गौरव वल्लभ, दीपेंद्र हुड्डा आणि सय्यद नासिर हुसेन या तिघांनी काँग्रेस पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. आता आम्ही खरगे यांचा प्रचार करु, असे वल्लभ यांनी सांगितले.
दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कर्नाटक येथे 6 ऑक्टोबर रोजी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहेत. तामिळनाडू, केरळनंतर राहुल यांची यात्रा शुक्रवारी कर्नाटकात दाखल झाली. ही यात्रा कर्नाटकात 21 दिवस चालणार असून 511 किमी प्रवास करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App