काँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने!!; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य


प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची नियमानुसार मतदानाने निवडणूक होणार असली तरी वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने चालले असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ काँग्रेसमध्ये मोकळ्या वातावरणात होत असलेल्या निवडणुकीत देखील नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. Congress President Election: Mallikarjun Kharge’s name towards consensus

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वतीने एकूण 14 अर्जांचा संच दाखल झाला आहे, तर शशी थरूर यांच्या वतीने 5 अर्जांचा संच दाखल झाला आहे. झारखंड मधील काँग्रेसचे नेते के. के. त्रिपाठी यांनी एक अर्ज दाखल केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव आज पहाटेच निश्चित झाल्याचे आढळले आहे. कारण काँग्रेसच्या बहुतेक वरिष्ठ नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना आपला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला आहे. शशी थरूर यांनी देखील काँग्रेस अध्यक्षपदाची लढत मैत्रीपूर्ण असल्याचे सांगून जो कोणी जिंकेल, त्यापेक्षा काँग्रेस विजयी होईल, असे आधीच जाहीर केले आहे. दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी माघार घेऊन निवडणुकीत अर्ज दाखल केलेला नाही. बहुसंख्य वरिष्ठ नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाला जाहीर पाठिंबा देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सर्वसहमतीच्या दिशेने पुढे नेली आहे.

 कर्नाटक मधले दुसरे काँग्रेस अध्यक्ष

मल्लिकार्जुन खर्गे हे सर्व सहमतीने अथवा प्रत्यक्ष निवडणुकीने अध्यक्ष बनले, तर ते कर्नाटक राज्याचे दुसरे काँग्रेस अध्यक्ष असतील. याआधी एस. निजलिंगप्पा यांनी 1969 पूर्वीच्या अखंड काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषविले होते पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यात समन्वय राखण्याचे जिकरीचे काम त्यांनी केले होते. पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वाद झाल्यानंतर त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेसचे उभे विभाजन झाले होते नंतर ते संघटना काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते.

 नेहरू गांधी परिवाराचे निष्ठावंत

80 वर्षांचे मल्लिकार्जुन खर्गे हे उत्तर कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करतात. सोलापूर पासून जवळच असल्याने ते उत्तम मराठी देखील बोलतात. नेहरू गांधी परिवाराचे निष्ठावंत नेते अशी त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर कर्नाटकात दलित ओबीसी समुदायाचे लोकप्रिय नेते ही देखील त्यांची जान पहचान आहे.

 खर्गे यांच्या पुढील आव्हाने

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान नोव्हेंबर 2022 मधील गुजरात विधानसभा निवडणूक, त्यानंतर 2023 मधली राजस्थान विधानसभा निवडणूक हे असेल. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश सारख्या छोट्या राज्यांच्याही निवडणुका 2023 मध्ये अपेक्षित आहेत. खर्गे यांच्याकडे सर्वात मोठे टास्क 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला काँग्रेसचा राजकीय परफॉर्मन्स उंचावण्याचे असेल.

Congress President Election: Mallikarjun Kharge’s name towards consensus

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण