विशेष प्रतिनिधी
जयपूर : हत्येसह शंभराहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आणि चंबळच्या भयानक डाकूंपैकी शेवटचा मानला जाणारा जगन गुर्जर याने कॉँग्रेसच्या आमदारावर धक्कादायक आरोप केला आहे. आपल्या विरोधकाला मारण्याची सुपारी बारीचे आमदार गिरीराज सिंग यांनी दिले असल्याचे त्याने म्हटले आहे. यामुळे आता दोघांच्यातच जुंपली आहे.Congress MLA orders beheading of a oppnent to notorious dacoit
व्हिडीओच्या माध्यमातून जगन गुर्जर याने या आमदाराला धमकावलं असून सुरक्षेशिवाय आपला सामना करण्याचं आव्हान दिले आहे. डाकू गुर्जर याच्या धमकीला या आमदाराने प्रत्युत्तरही दिलं आहे. बारीचे आमदार गिरीराज सिंग मलिंगा यांनी डाकू गुर्जरला प्रतिआव्हान दिलं आहे. मर्द का बच्चा असशील तर समोर ये, असं या आमदारांनी म्हटलं आहे.
आपल्या विरोधकाला मारण्यासाठी मलिंगा यांनी आपल्याला सांगितलं, मात्र ते न केल्याने मलिंगा आपल्या विरोधात गेल्याचा गुर्जरचा दावा आहे. त्यामुळेच आता तो मलिंगा यांना जाहीरपणे धमक्या देत आहे. राजपूत आमदार गुज्जर समाजाच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचा आरोपही या डाकूने केला आहे.
हे सर्व २४ जानेवारीच्या सुमारास सुरू झाले, जेव्हा गुर्जरने आमदार मलिंगा यांना आव्हान देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले, अशी माहिती धौलपूरमधील बसई डांग पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आशुतोष चरण म्हणाले. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये गुर्जर मलिंगा यांना शिवीगाळ करताना आणि धमकी देताना दिसत आहे.
गुर्जरने व्हिडीओमध्ये आरोप केला आहे की मलिंगा यांनी त्याला जसवंत विधायक (जसवंत आमदार) म्हणून संबोधलेल्या व्यक्तीला मारण्यास सांगितले होते, जे त्याने केले नाही. मलिंगा यांनी मात्र या दरोडेखोराचे आरोप फेटाळून लावले आहेत.दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये गुर्जर मलिंगा यांना दोन तासांसाठी आपली सुरक्षा काढून त्याला सामोरे जाण्याचे आव्हान देतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App