Congress MLA Morwal : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याजवळील बडनगर येथील कॉंग्रेसच्या आमदाराच्या मुलावर पोलिसांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी आमदार पुत्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने 12 जुलै रोजी अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. बलात्काराचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस नेत्या म्हणाल्या की, एफआयआर नोंदल्यानंतरही पोलीस अद्यापपर्यंत आरोपीला पकडू शकलेले नाहीत. Congress MLA Morwal son accused of rape, MP police put a reward of Rs 5,000
विशेष प्रतिनिधी
उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याजवळील बडनगर येथील कॉंग्रेसच्या आमदाराच्या मुलावर पोलिसांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी आमदार पुत्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने 12 जुलै रोजी अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. बलात्काराचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस नेत्या म्हणाल्या की, एफआयआर नोंदल्यानंतरही पोलीस अद्यापपर्यंत आरोपीला पकडू शकलेले नाहीत.
3 महिन्यांपूर्वी पीडित महिलेने उज्जैनजवळील बडनगरमधील कॉंग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडित महिला युवा कॉंग्रेसची पदाधिकारी आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, काही महिन्यांपूर्वी आरोपी करण तिला भंवरकुआन परिसरातील हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅट रोडवर करणच्या संपर्कात आली होती. या वेळी दोघांमध्ये एक मैत्री वाढली. हळूहळू पीडितेने फोन व मेसेजद्वारे बोलण्यास सुरूवात केली. पीडितेच्या आरोपानुसार, अनेक वेळा आरोपी तिला भेटण्यासाठी इंदूरलाही गेला होता. आरोपीने तिच्यावर इंदूरजवळील हॉटेलमध्ये लग्न करण्याचे आमिष दाखवून अंमली पदार्थ खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला होता.
12 जुलै रोजी कोर्टाने आरोपी करण मोरवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आरोपी करण मोरवालने अटकपूर्व जामिनाचे काही पुरावे सादर केले होते, त्या घटनेच्या वेळी आरोपीने काही कारणास्तव स्वत: रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले होते. या पुराव्यांच्या आधारे आरोपी कोर्टाकडे जामीन मागत होता, परंतु पीडितेने कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅप संदेशासारखे काही पुरावे सादर केले. यावर आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा कोर्टाने फेटाळला. पीडितेने पोलिसांवर आरोप केला आहे की, एफआयआर नोंदविल्याच्या 100 दिवसानंतरही पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही.
Congress MLA Morwal son accused of rape, MP police put a reward of Rs 5,000
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App