दलित मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये काँग्रेस – मायावती यांच्यात घमासान!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली / लखनऊ : पंजाबमध्ये काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना बदलून चरणजीत सिंग चन्नी यांच्या रूपाने दलित नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसविले आहे. यावरून काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यात राजकीय घमासान सुरू झाले आहे.Congress-Mayawati squabble in Punjab over Dalit CM issue

राहुल गांधी यांनी धाडसाने निर्णय घेऊन दलित व्यक्तीला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नेमले आहे. एक धडाडीचा नेता पंजाबी जनतेच्या सेवेत आला आहे, असे ट्विट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले आहे.



तर मायावती यांनी हा काँग्रेसचा निवडणूक हातखंडा आहे. त्यांनी फक्त तीन-चार महिन्यांसाठी दलित मुख्यमंत्री नेमला आहे. कायमस्वरूपी दलित मुख्यमंत्री त्यांना दिसत नाही, अशी टीका केली आहे. दलितांनी आणि बहुजन समाजाने काँग्रेसच्या या राजकीय ढोंगीपणाला फसू नये, असे आवाहन मायावती यांनी केले आहे.

त्यावर काँग्रेसने देखील मायावतींवर पलटवार करून हिंमत असेल तर मायावती यांनी पंजाबच्या निवडणुकीत दलित नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, असे आव्हान दिले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिले आहे.

पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झाली आहे. बहुजन समाज पक्षाला अकाली दलाने 20 जागा सोडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मायावतींनी शिफारस केलेले नेते मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.

कारण अकाली दल 97 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मायावतींची ही राजकीय कुचंबणा लक्षात घेऊनच काँग्रेसने त्यांना दलित नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्याचे आव्हान दिले आहे. यावर मायावती काय उत्तर देणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

Congress-Mayawati squabble in Punjab over Dalit CM issue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात