Congress leader randeep surjewala : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काँग्रेसने सोमवारी चिंता व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “गूए मौन” तोडून शेजारील देशासाठी पुढे काय करणार, हे देशाला सांगावे. भारतीय मुत्सद्दी आणि तेथील नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी काय रणनीती आहे किंवा काय योजना आहे, हे समजले पाहिजे. Congress leader randeep surjewala slams pm narendra modi ask to break his silence on the afghanistan issue
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काँग्रेसने सोमवारी चिंता व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “गूए मौन” तोडून शेजारील देशासाठी पुढे काय करणार, हे देशाला सांगावे. भारतीय मुत्सद्दी आणि तेथील नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी काय रणनीती आहे किंवा काय योजना आहे, हे समजले पाहिजे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसला नरेंद्र मोदी सरकारकडून परिपक्व धोरणात्मक आणि मुत्सद्दी प्रतिसादाची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीने अतिशय धोकादायक वळण घेतले आहे. अफगाणिस्तानच्या बाबतीत भारताचे धोरणात्मक हितसंबंध पणाला लागले आहेत. आमच्या मुत्सद्दी आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. देशाच्या हिताचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक निर्णयासोबत काँग्रेस उभी आहे.
सुरजेवाला यांनी ठामपणे सांगितले की, “अफगाणिस्तानचे सरकार गेल्यावर आणि तालिबानने सत्ता हस्तगत केल्यावर आम्हाला भारत सरकारकडून परिपक्व राजकीय, धोरणात्मक आणि मुत्सद्दी प्रतिसादाची अपेक्षा आहे. त्यांनी आरोप केला, “या परिस्थितीत नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारचे मौन चिंताजनक आहे, ते गूढदेखील आहे.”
त्यांनी असा दावा केला की, “मोदी सरकारने आमचे मुत्सद्दी आणि नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतीही योजना आखलेली नाही, हे सरकारच्या निष्काळजीपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. असा निष्काळजीपणा स्वीकारला जाऊ शकत नाही. त्यांच्या मते, अनेक दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या मदतीने भारतविरोधी कारवाया करतात, त्यामुळे मोदी सरकारचे ‘मौन’ चिंताजनक आहे.
सुरजेवाला म्हणाले, “पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी पुढे येऊन देशाला सांगावे की, आमच्या मुत्सद्दी आणि नागरिकांना सुरक्षितपणे कसे परत आणले जाईल आणि अफगाणिस्तानच्या संदर्भात आमची पुढील रणनीती काय असेल?”
काबूलमध्ये तालिबान्यांनी ताबा घेतला आणि नंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. अनेक देशांनी हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानातून बाहेर पडणाऱ्या अफगाण लोकांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. भारत नागरिकांना तसेच अफगाणिस्तानच्या ‘राजकीय निर्वासितांना’ आश्रय देत आहे. रविवारी तालिबानने राजधानी काबूलसह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केला.
Congress leader randeep surjewala slams pm narendra modi ask to break his silence on the afghanistan issue
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App