सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर एका महिला आणि पुरुषाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:ला पेटवून घेतले

BSP MP Atul Rai Rape Case Victim and Man attempt suicide outside supreme court gate

supreme court gate : एका महिलेने आणि पुरुषाने सुप्रीम कोर्टाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेटबाहेर स्वतःला पेटवून घेतले. दोघांनी गेट क्रमांक डी मधून आत जाण्याचा प्रयत्न केला होता. पण ओळखपत्राशिवाय आत गेल्यावर त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले. यानंतर दोघांनीही पेटवून घेतले. BSP MP Atul Rai Rape Case Victim and Man attempt suicide outside supreme court gate


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका महिलेने आणि पुरुषाने सुप्रीम कोर्टाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेटबाहेर स्वतःला पेटवून घेतले. दोघांनी गेट क्रमांक डी मधून आत जाण्याचा प्रयत्न केला होता. पण ओळखपत्राशिवाय आत गेल्यावर त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले. यानंतर दोघांनीही पेटवून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेने पेटवून घेतले तिनेच बसपाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा तो पुरुष या प्रकरणातील साक्षीदार आहे. दोघांनाही तातडीने पोलीस व्हॅनने रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांना घटनास्थळावरून एक बाटलीही सापडली आहे. हे दोघे बाटलीतून ज्वलनशील पदार्थ घेऊन आले होते आणि त्याद्वारे स्वतःला पेटवून घेतल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

BSP MP Atul Rai Rape Case Victim and Man attempt suicide outside supreme court gate

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था