वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेते, मुख्यमंत्र्यांचे शेतकरी प्रेम उफाळून आले आहे. आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धूही लाखीमपूर खेरीकडे धावले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी दुसऱ्या राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी धावत आहेत. परंतु आपल्या राज्यातील प्रश्नांकडे पाठ फिरवून आपल्याच जनतेवर अन्याय करत आहे. Congress leader, CM’s farmer love blossomed; Navjot Singh Sidhu also ran towards Lakhimpur Kheri
उत्तर प्रदेशात लाखीमपूर खेरी भागात दोन दिवसांपूर्वी हिंसक घटना घडली. तेथील शेतकऱ्यांना भेटण्याचा बहाण्याने तेथील वातावरण अधिक चिघळविण्याचा काँग्रेस सह विरोधी पक्षांचा हेतू आहे. शेतकऱ्यांची सहानुभूतीचा आव आणणाऱ्या या मंडळीनी पूर्वी सत्तेवर असताना कधीही भले केले नाही. त्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात सर्वात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्यावेळी शरद पवार सारखे नेते स्वतःला ‘ रयतेचे राजे’ म्हणून मिरवित होते. केंद्राने शेतकरी हिताचे कायदे केले तेव्हा विरोध केला. पण, याच कायद्याचा आग्रह स्वतः कृषिमंत्री असताना धरला होता. राज्यात केंद्राचे कायदे लागू करणार नाही, असे सांगणाऱ्या ठाकरे – पवार सरकारने त्यांच्या कायद्याचा मसुदा आधी जाहीर करण्याची गरज आहे. तो गुलदस्त्यात का आहे ? शेतकरी हिताच्या नुसत्या बाता हे सरकार मारत आहे, कारण कृती कोणतीच करत नाही.
‘आमचे जरा वेगळे’ अशी वृत्ती सोडा
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, सचिन पायलट यांनी लाखीमपूर खेरी जणू पिकनिक स्पॉट असल्याप्रमाणे येथे धाव घेण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने जे शेतकरी कायदे केले आहेत. ते शेतकरी हिताचे आहेत. ते काही राज्यांनी ‘आमचे जरा वेगळे’ म्हणून लागू केले नाहीत. जेथे शेतकरी आणि जनतेचा फायदा होत असेल त्यात खो घालण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस जीएससटीत समावेश करण्याचा विचार सुरू झाला तेव्हा विरोधकांनी ‘ आमचं जरा वेगळे आहे’ , असे सांगून या प्रस्तावाला विरोध करून जनहिताच्या कार्यात आपले पांढरे पाय घातले. त्यामुळे इंधन स्वस्त झाले नाही.
नवजोत सिंह सिद्धू यांचा ताफा अडविला
दरम्यान , नवजोत सिंह सिद्धू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवजोत सिंह सिद्धू हे आज ( ता. ७ ) हजारो वाहनांचा ताफा घेऊन लाखीमपूर खिरीच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, त्याच्या वाहनांचा ताफा यमुना नगर (हरियाणा) -सहारनपूर (यूपी) सीमेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला आहे. अडथळे दूर करुन हा ताफा पुढे जाण्याचा प्रयत्न होता. सिद्धू यांच्यासह कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App