काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष; संसदेत सर्व विरोधकांची एकजूट घडविण्याचा निर्धार!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात काँग्रेस हाच मुख्य राष्ट्रीय पक्ष आहे. सध्या तो मुख्य विरोधी पक्ष आहे. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात सर्व विरोधी पक्ष्यांच्या एकजुटीची ताकद आम्ही दाखवून देऊ, असा निर्धार काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.Congress is the main opposition party; Determination to unite all the Parliament in Parliament !!

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली यामध्ये हा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, पक्षाचे प्रतोद जयराम रमेश, आनंद शर्मा, ए. के. अँटनी आदी नेते उपस्थित होते.संसदेचे अधिवेशन 29 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये काँग्रेसची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीतच काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पेट्रोल-डिझेलची महागाई, शेतकरी आंदोलन, लखीमपूर हिंसाचार, गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेणी यांचा राजीनामा, भारतीय भूमीत चीनची घुसखोरी, पेगासस हेरगिरीचा मुद्दा आदि विषयांवर काँग्रेस पुढाकार घेऊन मोदी सरकारकडे जबाब मागेल.

या मुद्द्यांवर सर्व विरोधी पक्षांची भाषा एकच असेल यासाठी सर्व गटनेत्यांबरोबर काँग्रेसचे नेते बोलतील, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.एक प्रकारे काँग्रेसच्या विरोधी पक्ष म्हणून असणाऱ्या राजकीय वर्चस्वावर या बैठकीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न झाला.

Congress is the main opposition party; Determination to unite all the opposition in Parliament !!

महत्त्वाच्या बातम्या