Restrictions In Emergency : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने आमच्या लोकशाही मूल्यांनाच चिरडले नाही, तर महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधकारात ढकलला होता. आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधानांनी आणीबाणीला विरोध दर्शविणार्या आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवल्या. Congress crushed our democratic values, what were the restrictions in emergency? Facts shared by PM Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने आमच्या लोकशाही मूल्यांनाच चिरडले नाही, तर महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधकारात ढकलला होता. आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधानांनी आणीबाणीला विरोध दर्शविणार्या आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवल्या.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, “अशाप्रकारे कॉंग्रेसने आपल्या लोकशाही मूल्यांना चिरडले. आणीबाणीला विरोध दर्शविणार्या आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या सर्व महापुरुषांना आम्ही आठवतो.”
This is how Congress trampled over our democratic ethos. We remember all those greats who resisted the Emergency and protected Indian democracy. #DarkDaysOfEmergency https://t.co/PxQwYG5w1w — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
This is how Congress trampled over our democratic ethos. We remember all those greats who resisted the Emergency and protected Indian democracy. #DarkDaysOfEmergency https://t.co/PxQwYG5w1w
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
पंतप्रधानांनी दुसर्या ट्वीटमध्ये लिहिले, “#DarkDaysOfEmergency कधीही विसरू शकत नाही. 1975 ते 1977 या कालावधीत संस्थांचा पद्धतशीर विनाश झालेला पाहिला. चला आपण भारताच्या लोकशाही भावनेला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प घेऊया आणि आपल्या संविधानातील निहित मूल्यांवर खरे उतरू.”
The #DarkDaysOfEmergency can never be forgotten. The period from 1975 to 1977 witnessed a systematic destruction of institutions. Let us pledge to do everything possible to strengthen India’s democratic spirit, and live up to the values enshrined in our Constitution. — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
The #DarkDaysOfEmergency can never be forgotten. The period from 1975 to 1977 witnessed a systematic destruction of institutions.
Let us pledge to do everything possible to strengthen India’s democratic spirit, and live up to the values enshrined in our Constitution.
यासह पीएम मोदी यांनी इन्स्टाग्रामवर भाजपने शेअर केलेली तथ्यांची स्लाइडही शेअर केली आहे, जी आणीबाणीशी संबंधित आहे. आणीबाणीशी संबंधित असलेल्या या स्लाइडमध्ये कॉंग्रेसच्या तत्कालीन सरकारने बंदी घातलेल्या गोष्टी दर्शवण्यात आल्या आहेत.
View this post on Instagram A post shared by BJP – Bharatiya Janata Party (@bjp4india)
A post shared by BJP – Bharatiya Janata Party (@bjp4india)
1975 ते 1977 दरम्यान म्हणजेच आणीबाणीच्या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद देशभक्त चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्यावरील चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. याखेरीज किशोर कुमार यांची गाणी, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासही बंदी होती.
25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या काळात 21 महिन्यांच्या कालावधीसाठी देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या.
Congress crushed our democratic values, what were the restrictions in emergency? Facts shared by PM Modi
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App