जयललिता मम्मी तर नरेंद्र मोदी डॅडी म्हणणाऱ्या द्रुमुक नेते दयानिधी मारन यांच्या विरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार


द्रुमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक आयोगाने दणका देत ४८ तास प्रचारासाठी बंदी घातल्यावर आता दुसरे नेते दयानिधी मारन यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. एआयडीएमके कार्यकर्त्यांसाठी जयललिता मम्मी तर नरेंद्र मोदी डॅडी आहेत. पाहा काय नाते आहे, असे त्यांनी म्हटले होते. Complaint lodged with Election Commission against DMK leader Dayanidhi Maran


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : द्रुमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक आयोगाने दणका देत ४८ तास प्रचारासाठी बंदी घातल्यावर आता दुसरे नेते दयानिधी मारन यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. एआयडीएमके कार्यकर्त्यांसाठी जयललिता मम्मी तर नरेंद्र मोदी डॅडी आहेत. पाहा काय नाते आहे, असे त्यांनी म्हटले होते.

सत्ताधारी अखिल भारतीय द्रवीड मुनेत्र कळघमने (एआयएडीएमके) मारन यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. असंसदीय वक्तव्यासाठी मारन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एआयएआयडीएमकेने केली आहे. 

पक्षाचे सहसचिव आर. एम. बाबू मुरगवेली यांनीम्हटले आहे की मारन यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांनी आपल्या असंसदीय वक्तव्याने जयललिता आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविले आहेत. २८ मार्च रोजी सभेत मारन यांनी हे वक्तव्य केले होते.

एमआयए डीमकेच्या कार्यकर्त्यांसाठी जयललिता या मम्मी तर नरेंद्र मोदी डॅडी आहेत. काय पण नाते आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी एआयएडीएमकेचे मंत्री राजेंथ्रा बालजी यांनी म्हटले होते की मोदी हे आमचे डॅडी आहेत. हाच संदर्भ मारन यांनी दिला होता. मारन यांना प्रचार करणपासून बंदी घालावी अशी मागणी बाबू यांनी केली आहे.

Complaint lodged with Election Commission against DMK leader Dayanidhi Maran

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती