अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी करचोरीवरून अ‍ॅमेझॉनला फटकारले

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगातील बलाढ्य कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनला करचोरीवरून फटकारले आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने फेडरल टॅक्स भरेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगातील बलाढ्य कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनला करचोरीवरून फटकारले आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने फेडरल टॅक्स भरेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.बायडेन यांनी अमेरिकेत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स वाढविण्याचे संकेत दिले आहेत.US President Joe Biden slams Amazon over tax evasion

यामध्ये सध्याचा असलेला कॉर्पोरेट टॅक्स २१ टक्यांवरून २८ टक्के होणार आहे. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून आपल्या नफ्यातील मोठा हिस्सा अमेरिकेबाहेरील देशात नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी कायद्यामध्ये विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी व्हाईट डाऊसकडून २५ पानी अहवालही जारी करण्यात आला आहे.



बायडेन म्हणाले, अमेरिकेतील फॉर्च्यून ५०० नावाने ओळखल्या जाणाºया कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीने अनेक चालबाजा केल्या आहेत. ही कंपनी एक पेनीही फेडरल टॅक्स भरत नाही. याच्या उलट मध्यमवर्गीय अमेरिकी माणूस आपल्या उत्पन्नातील २० टक्के टॅक्स म्हणून भरत असतो. त्यांना शिक्षा करण्याची माझी इच्छा नाही परंतु ते जे करत आहेत ते चुकीचे आहे.

बायडेन यांच्या वक्तव्यावर अ‍ॅमेझॉन कंपनीने खुलासा जारीकेला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की संशोधन आणि विकास विभागासाठी केलेल्या खर्चासाठी टॅक्स क्रेडीट घेतले म्हणजे लूपहोल किंवा चालबाजी होत नाही. याचे कारण ही तरतूद १९८१ सालापासून सुरू आहे. आत्तापर्यंत १५ वेळा या तरतूदीला मुदतवाढ मिळाली आहे.

बायडेन यांनी यापूर्वीही अ‍ॅमेझॉन कंपनीवर करचोरीचा आरोप केला होता. जुलै २०१९ मध्ये ते म्हणाले होते की कोट्यवधी रुपये फायदा कमाविणारी कंपनी शिक्षकापेक्षाही कमी कर भरते.

US President Joe Biden slams Amazon over tax evasion

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात