दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शिअल गॅस सिलेंडर्स 266 रुपयांनी महागले; घरगुती गॅस ग्राहकांना मात्र दिलासा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शियल गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीमध्ये आता कमर्शियल गॅस सिलेंडर दोन हजार रुपयांना मिळेल. घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना मात्र या भाववाढीतून सध्या वगळण्यात आले असून त्यांना हा तात्पुरता दिलासा दिला असल्याचे मानण्यात येत आहे.Commercial gas cylinders go up by Rs 266 on Diwali

एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत असताना कमर्शियल गॅस सिलेंडर देखील महागल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या मिठाईच्या उलाढालीवर होणार आहे. दिवाळीची पारंपारिक पारंपरिक मिठाई सध्या महाग आहेच,पण येत्या चार दिवसांमध्ये ऐन दिवाळी सणात सिलेंडर महागल्याने त्याचा परिणाम मिठाईच्या दरांवर देखील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीची ताजी मिठाई आता ग्राहकांना आणखी महाग दराने घ्यावी लागणार आहे.त्यामुळे गेल्या वर्षीची दिवाळी कोरोनाच्या सावटात गेली. या वर्षीची दिवाळी महागाईच्या सावटात जाणार असल्याचेही दिसून येत आहे.

Commercial gas cylinders go up by Rs 266 on Diwali; Consolation to domestic gas consumers

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती