ब्राम्हणांविषयी वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे छत्तीसगढचे मुख्यमंत्री बघेल आले चांगलेच अडचणीत


विशेष प्रतिनिधी

रायपूर – कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, मग ते माझे ८६ वर्षांचे वडील असले तरी…आमचे राजकीय मते आणि विचार अत्यंत वेगळे आहेत हे उद्गार आहेत छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे. एक मुलगा म्हणून मला त्यांचा आदर वाटतो, पण मुख्यमंत्री या नात्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी कोणतीही चूक मी माफ करणार नाही. CM Baghel gets trouble due to his fathers remarks

त्यांचे वडील नंदकुमार यांच्यावर वादग्रस्त विधानाबद्दल प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.नंदकुमार यांनी नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, ब्राह्मण्यांना तुमच्या गावात प्रवेश करू देऊ नका असे आवाहन मी भारतातील गावकऱ्यांना करतो आहे.



त्यांच्यावर बहिष्कार टाकता यावा म्हणून मी इतर प्रत्येक समाजाशी बोलणार आहे. ब्राह्मणांची रवानगी पुन्हा व्होल्गा नदीच्या किनारी करायला हवी.याप्रकरणी सर्व ब्राह्मण समाज या संस्थेने तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला.

या पार्श्वभूमीवर बघेल म्हणाले की, माझ्या वडिलांनी एका विशिष्ट समाजाविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे जातीय शांतता धोक्यात आली आहे. मला त्यांच्या विधानाचे दुःख होते.

CM Baghel gets trouble due to his fathers remarks

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात