जावयाला आर्थिक दबावातून सोडविण्यासाठी छत्तीसगढचे मुख्यमंत्री बघेल यांचा खासगी मेडिकल कॉलेजच्या सरकारीकरणाचा खटाटोप!


वृत्तसंस्था

छत्तीसगढ : जावयाच्या नातेवाईकांचे एक खासगी मेडिकल कॉलेज चक्क सरकारी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी कायदाच करण्याचा घाट घातला आहे. Chhattisgarh: Bhupesh Baghel proposes law to acquire pvt college owned by son-in-law’s kin

दुर्ग येथे चंदूलाल चंद्रकर मेमोरियल मेडिकल कॉलेज आहे. १ मार्च १९९७ मध्ये झालेल्या नोंदणीनुसार चंदूलाल चंद्रकर मेमोरियल हॉस्पिटल (सीसीएमएच) च्या मालकीचे हे महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय आर्थिक अडचणीत आल्यामुळे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कायद्याच्या माध्यमातून, छत्तीसगड सरकारच्या ताब्यात घेण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे भूपेश बघेल यांच्या मुलीच्या सासरच्या मंडळीच्या मालकीचे हे कॉलेज आहे. त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

राज्य सरकार दुर्गमधील चंदूलाल चंद्रकर मेमोरियल मेडिकल कॉलेज घेण्यासाठीचे विधेयक तयार करत आहे.
चंदूलाल चंद्रकर हे कॉंग्रेसचे नेते होते. दुर्ग येथून पाचवेळा लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. १९९५ मध्ये त्यांचे निधन झाले. चंद्रकर समाजाने त्यांच्या स्मृती म्हणून रुग्णालयाची उभारणी केली. सीसीएमएचचे संचालक मंगल प्रसाद चंद्रकर आहेत. ते भागधारकांपैकी एक असून कंपनीत त्यांचा हिस्सा जवळजवळ ५९ टक्के आहे.

द इंडियन एक्सप्रेसने विधेयकाचा मसुदा पाहिला आहे. त्यात “आर्थिक अडचणी” असल्यामुळे रुग्णालयाने राज्य सरकारला महाविद्यालय अधिग्रहण करण्याची विनंती केली. बरेच विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहेत, त्याच्या ‘ऑब्जेक्ट अ‍ॅण्ड कारणे’ स्टेटमेंटमधील विधेयकाच्या मसुद्याची नोंद घेतात आणि राज्य जनतेच्या हितासाठी “त्वरित संपादन” करणे आवश्यक आहे, असे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री भुपेश बघेल यांची मुलगी दिव्या बघेल यांचे लग्न क्षितिज चंद्रकर यांच्याशी झाले आहे. त्यांचे वडील विजय चंद्रकर हे मंगल प्रसाद चंद्रकार यांचे बंधू आहेत. ते चंदूलाल चंद्रकर मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक आहेत. गेल्या २ फेब्रुवारीला महाविद्यालय सरकारी करून घेण्याचे जाहीर केले होते.

नोकरशहाकडून तीन प्रमुख मुद्दे उपस्थित

महाविद्यालयाला १२५ कोटींचे कर्ज असून मोठा भाग असुरक्षित आहे

महाविद्यालयात भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या असून प्रकरण मेडिकल कौन्सिलच्या १ एप्रिल२०१८ च्या बैठकीत चर्चेला आल होत.

२०१७ पासून महाविद्यालयाला मान्यता मिळालेली नाही.

Chhattisgarh: Bhupesh Baghel proposes law to acquire pvt college owned by son-in-law’s kin

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण