पवारांनी कुठे पाठीत खंजीर खुपसला दाखवा?, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांना चंद्रकांतदादांचा “या” अभ्यासाचा सल्ला


विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप नेहमी होतो. मात्र त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण तरी दाखवा, मी राजकारण सोडून देईन, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना दिले होते. chandrakantdada patil advices sanjay raut to study history of maharashtra politics after emergency 1978. backsatbbing of vasantdada patil by sharad pawar

त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी हे सत्तेच्या राजकारणात एवढे वाहून गेले आहेत की त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा विसर पडला आहे. त्यांनी जरा आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा नीट अभ्यास करावा, असे ट्विट करून चंद्रकांतदादांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.आणीबाणीनंतर 1978 मध्ये शरद पवारांनी त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये बंड करून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. आणि ते स्वतः जनता पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर “पाठीत खंजीर खुपसणे” हा मराठी
वाक्प्रचार महाराष्ट्राच्या राजकारणात कुप्रसिद्ध झाला होता. वसंतदादा यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अनेकदा या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.

वास्तविक या 2009 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार होत्या. परंतु त्या वसंतदादा पाटील यांचा झालेला विश्वासघात कधी विसरल्या नाहीत. ही राजकीय पार्श्वभूमी चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या ट्विट मागे आहे आणि म्हणूनच त्यांनी संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या आणीबाणीनंतरच्या राजकारणाचा अभ्यास करण्याची मौलिक सूचना केली आहे.

chandrakantdada patil advices sanjay raut to study history of maharashtra politics after emergency 1978. backsatbbing of vasantdada patil by sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण