पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर

Sharad Pawar NCP Criticizes Modi Govt over farmers not getting price for Farm Produce

Sharad Pawar NCP Criticizes Modi Govt : शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल फेकून दिल्याच्या काही घटना घडल्या आहेत. माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की, जेव्हा त्यांच्याकडे कृषी विभाग होता, तेव्हा ते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देत असत. पण आता केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत.” Sharad Pawar NCP Criticizes Modi Govt over farmers not getting price for Farm Produce


विशेष प्रतिनिधी

पुणे : शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल फेकून दिल्याच्या काही घटना घडल्या आहेत. माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की, जेव्हा त्यांच्याकडे कृषी विभाग होता, तेव्हा ते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देत असत. पण आता केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत.”

शरद पवार महाराष्ट्रातील जुन्नर येथे शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करत होते. या बैठकीला महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. शरद पवार यांनी या सभेत माजी आमदार कै. शिवाजीराव महादेव आणि दादासाहेब काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले.

काय म्हणाले शरद पवार?

यावेळी शरद पवार म्हणाले, “शेतकर्‍यांचा खर्चही भागत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन फेकून देण्यास भाग पाडले जात आहे. कांद्याला भाव मिळत नाहीये. इतर उत्पादनांच्या बाबतीतही हेच आहे. माझ्याकडे दहा वर्षे कृषी मंत्रालय होते. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी मी वचनबद्ध राहिलो. शेतकरी देशवासीयांचे पोट भरतात. एवढेच नव्हे तर ते जगाच्या धान्याच्या गरजा पूर्ण करू शकतात. शेतकऱ्यांनी हे करून दाखवले आहे.”

कृषिमंत्री असताना झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा पवारांना विसर

यानंतर शरद पवारांनी त्यांच्या कामाची तुलना केंद्र सरकारशी केली. ते म्हणाले, “दुर्दैवाने, केंद्र सरकार या प्रकरणाकडे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. यामुळेच शेतकऱ्यांच्या मालाची किंमत घसरत आहे.” हा आरोप करत शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार हे विसरले की शेतकरी त्यांच्यावर खूप खुश होते, तर मग ते कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्यांच्या घटना का वाढल्या? ते राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले? राज्य सरकारची मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार? यावेळचा पूर बाजूला ठेवा, गतवर्षी राज्यात आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्याची भरपाई मिळाली का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

Sharad Pawar NCP Criticizes Modi Govt over farmers not getting price for Farm Produce

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती