तालिबानला शरण जायचे नाही, जखमी झाल्यास माझ्या डोक्यात दोनदा गोळी झाडण्यास रक्षकाला सांगितले – अमरुल्ला सालेह


वृत्तसंस्था

लंडन: तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पकड घट्ट केल्यानंतर आणि १५ ऑगस्टला काबुल पडण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रपती अब्दुल घनी यांनी पलायन केले. परंतु उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी आघाडी सांभाळली होती. स्वतःला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. शिवाय कोणत्याही परिस्थितीत तालिबान्यांना शरण जायचे नाही, अशी भूमिका घेतली होती. प्रसंगी पंजशीरकडे प्रयाण करताना चकमक उडून जखमी झाल्यास रक्षकाला माझ्या डोक्यात दोनदा गोळी झाडण्यास सांगितले होते” ,अशी धक्कादायक माहिती अमरुल्ला सालेह यांनी दिली. Don’t want to surrender to Taliban, have asked my guard to shoot me twice in head if I get wounded: Amrullah Saleh

सध्या पंजशीर खोऱ्यात तालिबान विरूद्ध आघाडीचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हे करत आहेत. त्यांनी काबुल पडल्यानंतरचा घटनाक्रम उघड केला आहे.ब्रिटनच्या वृत्तपत्र डेली मेलसाठी लिहिताना, ते म्हणाले, माजी राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळून गेल्यानंतर मी स्वत: ला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले.सालेह म्हणतात, गेल्या महिन्यात काबुलच्या दिशेने पोचलेल्या तालिबानशी लढण्याऐवजी अफगाण अधिकारी भूमिगत झाले होते.

काबूल पडल्याच्या आदल्या रात्री, पोलिस प्रमुखाने मला फोन केला की तुरुंगात बंड झाले आहे. तालिबानी कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर मी तालिबानशी संबध नसलेल्या कैद्यांचे नेटवर्क तयार केले आणि त्यांना बंड करण्याचे आदेश दिले. काही अफगाण विशेष दलाच्या मदतीने कारागृहातील परिस्थिती नियंत्रित केली.

ते म्हणाले की त्यांनी १५ ऑगस्टच्या सकाळी तत्कालीन संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी, तत्कालीन गृहमंत्री आणि त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मला ते सापडले नाहीत.

ते म्हणाले, “मला दोन्ही मंत्रालयाशी निष्ठावान असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, सैनिक किंवा कमांडोना आघाडीवर तैनात करू शकत नाहीत.”

सालेह म्हणाले की , हा क्षण अतिशय निराशाजनक होता. अशा वेळी शहरात कुठेही तैनात करण्यायोग्य अफगाण सैन्य शोधण्यात अपयश आले.
त्यानंतर मी काबूलच्या पोलीस प्रमुखांशी बोललो, एक अतिशय धाडसी माणूस ज्याला तो जिथे असेल तिथे माझ्या शुभेच्छा. त्याने मला माहिती दिली की पूर्वेकडील भूभाग तालिबानींनी बळकावला होता, दक्षिणेतील दोन जिल्हे पडले होते, आणि शेजारील प्रांत वर्दक सुद्धा पडला होता. मी त्यांना सांगितले किमान एक तास लढा द्या. यानंतर आम्ही तालिबानशी लढा पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार केला. काबुल पडल्यावर थेट पंजशीरला जाण्याचे ठरविले आहे.

‘मी माझ्या रक्षकाला सांगितले की ‘आम्ही आमच्या मार्गाने लढू. आम्ही एकत्र लढू. पण जर मी जखमी झालो तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. मला माझ्या डोक्यात दोनदा गोळ्या घाला. मला तालिबानला शरण जायचे नाही. यानंतर आम्ही काही चिलखती वाहनांच्या काफिल्यातून पंजशीर रवाना झालो. बंदुका असलेल्या दोन पिकअप ट्रकवर चढलो. पंजशीरला जाताना आमच्या काफिल्यावर दोनदा हल्लाही झाला. काबुल सोडण्यापूर्वी मी माझ्या घरी गेलो. तेथील पत्नी आणि मुलीची छायाचित्रे नष्ट केली, संगणक बरोबर घेतला.

अंगरक्षक रहीम बरोबर पंजशीरला रवाना झालो. या दरम्यान मी पंजशिरचा वाघ मानले जाणाऱ्या अहमद मसूदशी संधान बांधले. मी त्याला सांगितले की , मी कबुलमध्ये आहे. तू आणि मी मिळून तालिबनला धडा शिकवू शकतो. मी तुझ्या सैन्यात सामील होण्यास तयार आहे. अखेर आम्ही हल्ले चुकवत पंजशीरला पोचलो. तेथे पोचल्यावर एका मशिदीत आमचे स्वागत झाले. ना सैन्य, ना लष्करी सामग्री अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्ही तेथे पोचलो. त्यानंतर अहमद मसूद यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. आम्ही पुढील व्यूहरचनेवर त्या रात्री चर्चा केली.

आता प्रतिकार करणे सोपे नक्कीच नाही. मी कठीण परिस्थितीत आहे, यात शंका नाही. मी पोलादाचा नक्कीच बनलेलो नाही. मी एक माणूस आहे. मलाही भावना आहेत. मला माहित आहे की, तालिबानला माझे डोके हवे आहे. पण हा इतिहास आहे. आम्ही आता इतिहासाच्या केंद्रस्थानी आहोत.
– अमरुल्ला सालेह, माजी उपराष्ट्रपती, अफगाणिस्तान

Don’t want to surrender to Taliban, have asked my guard to shoot me twice in head if I get wounded: Amrullah Saleh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण