वृत्तसंस्था
चंदीगड : काल महागाईविरोधात हत्तीवर चढलेले नवज्योत सिंग सिद्धू हे सुप्रीम कोर्टाची एक वर्षभराची शिक्षा ऐकताच सरेंडर करण्यापूर्वी आजारी पडले आहेत. 34 वर्षांपूर्वीच्या रोड रेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कालच एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा होण्याच्या वेळी नवज्योत सिंग सिद्धू दिल्लीत नसून पतियाळात होते. ते कालच महागाई विरोधातील आंदोलनामध्ये हत्तीवर चढून बसले होते. पण त्यांना सुप्रीम कोर्टाने आपल्याला 1 वर्षाची शिक्षा दिल्याची बातमी समजली आणि ते आजारी पडले. Climbed the elephant against inflation yesterday; But before he could surrender, Sidhu fell ill
आता नवज्योत सिद्धू यांनी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामध्ये सिद्धू यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. सिद्धू यांनी यासाठी आजारी असल्याचे कारण दिले आहे. या प्रकरणी सिद्धूंना शिक्षा सुनावणाऱ्या खंडपीठाने क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर म्हणाले की, आम्ही हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवत आहोत, ते त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतील. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिलासा न दिल्यास सिद्धू यांना आज शरण जावे लागणार आहे.
34 वर्षे जुन्या रोड रेजप्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सिद्धूंची शिक्षा 1 वर्षाने वाढवली. त्याचबरोबर आत्मसमर्पणाच्या वेळी सिद्धू समर्थक त्यांच्या घराभोवती जमा झाले आहेत. पतियाळा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनीही यासंदर्भात कार्यकर्त्यांना संदेश पाठवला आहे. सिद्धू सध्या त्यांच्या पतियाळा येथील घरात आहे. त्यांचे समर्थक काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत.
Punjab | Congress leader Navjot Singh Sidhu rides an elephant in order to protest over inflation in Patiala pic.twitter.com/NaDho0E7VC — ANI (@ANI) May 19, 2022
Punjab | Congress leader Navjot Singh Sidhu rides an elephant in order to protest over inflation in Patiala pic.twitter.com/NaDho0E7VC
— ANI (@ANI) May 19, 2022
हायकोर्टातून सेशन कोर्टात पोहोचतील ऑर्डर
सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्रथम पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचणार आहे. तेथून त्यांना पतियाळाच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाठवण्यात येणार आहे. सिद्धू यांनी स्वत: आत्मसमर्पण केल्यास संबंधित पोलिस ठाण्याला अटक करण्यास सांगितले जाईल.
मृत गुरनाम सिंग यांच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. त्यांची सून परवीन कौर म्हणाल्या की, 34 वर्षांच्या लढाईत त्यांचे मनोबल कधीही ढासळले नाही. क्रिकेटपटू आणि नेता म्हणून सिद्धूंच्या लौकिकाकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. सिद्धूंना शिक्षा व्हावी एवढाच त्यांचा उद्देश होता.
केव्हा काय घडले…
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App