विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध अंगरक्षक मृत्युप्रकरणी सीआयडीने समन्स बजावले आहे.नंदीग्रामचे आमदार सुवेंदू यांना सोमवारी भवानी भवन येथील सीआयडी मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.CID issued summons to suvendu adhikari
त्यांचे अंगरक्षक शुभब्रत चक्रवर्ती यांचा सुमारे तीन वर्षांपूर्वी गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी म्हणून त्यांच्या पत्नीने कोंटाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीआयडीने आतापर्यंत ११ पोलिसांसह १५ पेक्षा जास्त व्यक्तींची चौकशी केली आहे.
अंगरक्षकाचा मृत्यू झाला तेव्हा सुवेंदू तृणमूल काँग्रेसचे खासदार होते. सीआयडीच्या पथकाने याआधी अधिकारी यांच्या पूर्व मेदिनीपूर येथील अधिकारी शांती कुंज या निवासस्थानीही भेट देऊन चौकशी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App