आयकर विभागाचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा, पंचाहत्तरी पार केलेल्यांना भरावा लागणार नाही आयकर परताव्याचा अर्ज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आयकर विभागाने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ७५ वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर परतावा (इनकम टॅक्स रिटर्न) भरण्याची गरज नाही. मात्र, त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे एकाच बॅँकेत खाते असणे आवश्यक असून त्यांना केवळ पेन्शनच्या माध्यमातूनच उत्पन्न मिळायला हवे.Great relief to the senior citizens of the Income Tax Department, those who have crossed the age of 75 will not have to pay the income tax return application.

आयकर विभागाच्या नवीन नियमानुसार, आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्यापासून सूट मिळवण्यासाठी ७५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना बॅँकेत केवळ एक फॉर्म भरावा लागेल. आयकर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांची दोन गटांत विभागणी केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ८० वर्षांवरील अतिवरिष्ठ ज्येष्ठ नागरिक. त्यांना हा फायदा मिळणार आहे. त्यांच्या एकूण परताव्याची संख्या ६.७८ कोटी आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या ७४ लाख तर अतिवरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांची संख्या चार लाख आहे.ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत देण्यासाठी ही सूट लागू करण्यासाठी, आयकर अधिनियम, 1961 मध्ये एक नवीन कलम, 194 पी जोडण्यात आले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना परतावा भरण्यातून सूट मिळणार आहे.

यासाठी काही अटीही आहेत. ज्येष्ठ नागरिक मागील वर्षी त्याच भागातील असावेत आणि त्यांना फक्त पेन्शन किंवा व्याज या मार्गातूनच उत्पन्न मिळायला हवे. ते एकाच बॅँकेत जमा व्हायला हवे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नाव, पत्ता, पॅन/आधार, जन्मतारीख, बँकेचे नाव, पेन्शन भरणारा नियोक्ता आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक (पीपीओ) यासह अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

केंद्राने फॉर्म 16 मध्ये स्वतंत्र अ‍ॅनेक्सचरही जोडले आहे. यामध्ये केवळ पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न आणि वजावटीचा तपशील असेल. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना काहीही करण्याची आवश्यकता असणार नाही. हा फॉर्म भरून देण्याची जबाबदारी बॅँकेची असणार आहे. मात्र, कोणाला कर परतावा हवा असेल तर त्याला इनकम टॅक्स रिटर्न सादर करावे लागणार आहे.

Great relief to the senior citizens of the Income Tax Department, those who have crossed the age of 75 will not have to pay the income tax return c.

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण