सगळे जग कोरोनाच्या मूळाच्या शोधात; तर चिनी नेतृत्व सांस्कृतिक क्रांती जगभरात फैलावाच्या विचारात…!!


वृत्तसंस्था

बीजिंग – संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाच्या शोधात सगळे जग असताना चीनचे सर्वोच्च नेतृत्व मात्र, चीनची नवी सांस्कृतिक क्रांती जगभर फैलावाच्या विचारात असल्याचे स्पष्ट होत आहे. Chinese spin doctors to push the revolution

कोरोनाच्या विषाणूचे मूळ कोठे आहे, हे शोधण्यासाठी चीनने मदत करावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाने आपला एक वेगळाच मनसूबा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) बैठकीत जाहीरपणे मांडला आहे.

सगळ्या जगात चीनची सांस्कृतिक ओळख करून देण्याची गरज चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी सीसीपीच्या बैठकीत व्यक्त केली. यासाठी एक नवीन कार्यक्रमाचा आराखडाच त्यांनी सीसीपीसमोर ठेवला. ते म्हणाले, आज जगाला चीनच्या सांस्कृतिक क्रांतीची ओळख करून देण्याची गरज आहे. सगळ्या जगात चीनच्या संस्कृतीचा आवाज पोहोचविण्याची आपली जबाबदारी आहे. ही संस्कृती जगाला समजावून सांगण्याची, शिकविण्याची आणि जगात अधिक चांगल्या पध्दतीने ठसविण्याची गरज आहे. ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. चीनची एक विश्वासार्ह, प्रेमळ आणि आदरणीय प्रतिमा सगळ्या जगासमोर उभी करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.



जगात उठणारे चीन विरोधातील सूर आपण नियंत्रणात आणले पाहिजेत. त्याचवेळी चीनची सौम्य आणि विनम्र देश असल्याची प्रतिमा आपल्याला उभी करता आली पाहिजे, यावर जिंगपिंग यांनी आपल्या भाषणात विशेष भर दिला.

जिंगपिंग म्हणाले, की आपण आता सगळ्या जगाला चीनची विकासाची, सभ्यतेची, सुरक्षेची, मानवाधिकाराची, पर्यावरणाची, आंतरराष्ट्रीय राजकीय उतरंडीची आणि जागतिक कारभार व्यवस्थेची या सगळ्या संकल्पना समजावून सांगून त्या अमलात आणण्यासाठी आग्रही राहिलो पाहिजे.

चीनने संज्ञापनाच्या नव्या संकल्पना अमलात आणल्या पाहिजेत. जगाच्या कानाकोपऱ्यात संज्ञापनाच्या ज्या भाषा आणि पध्दती आहेत, त्या आत्मसात करून त्या देशांना, जनसमूहांना चीनच्या सांस्कृतिक संकल्पना समजावून दिल्या पाहिजेत. सीसीपीचा मेसेज त्यांच्यापर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविला पाहिजे, यावर देखील जिंगपिंग यांनी भर दिला आहे.

Chinese spin doctors to push the revolution

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात