China visa condition, you have to take Chinese vaccine, only those who do so will get easy entry into the country

China Visa Condition : चीनमध्ये प्रवेशासाठी घ्यावी लागेल चिनी लस, व्हिसासाठी घातली अट, असे करणाऱ्यांनाच देशात मिळेल सहज प्रवेश

कोरोना महामारीमुळे परदेशी व्यक्तींना सध्या चीनमध्ये जाण्याची परवानगी नाही. परंतु आता लवकरच हे निर्बंध संपुष्टात येणार आहेत. लवकरच भारत, अमेरिका आणि पाकिस्तान यासारख्या देशांच्या नागरिकांना प्रवेश देणार असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने यासाठी काही अटी घातल्या असल्या आहेत. यानुसार चीनने म्हटले आहे की, ज्यांनी चीनची लस घेतली आहे, अशा व्यक्तींना चीनमध्ये सहज प्रवेश दिला येईल. China visa condition, you have to take Chinese vaccine, only those who do so will get easy entry into the country


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे परदेशी व्यक्तींना सध्या चीनमध्ये जाण्याची परवानगी नाही. परंतु आता लवकरच हे निर्बंध संपुष्टात येणार आहेत. लवकरच भारत, अमेरिका आणि पाकिस्तान यासारख्या देशांच्या नागरिकांना प्रवेश देणार असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने यासाठी काही अटी घातल्या असल्या आहेत. यानुसार चीनने म्हटले आहे की, ज्यांनी चीनची लस घेतली आहे, अशा व्यक्तींना चीनमध्ये सहज प्रवेश दिला येईल.

चिनी दूतावासाने अनेक देशांमध्ये व्हिसासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, जर एखाद्याने चिनी लस घ्यायला आला तर त्यांना व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. अमेरिकेच्या चिनी दूतावासानेही असेच निवेदन दिले आहे. नियमांनुसार, लोकांना व्हिसा मिळण्यापूर्वी 14 दिवस आधी लस घ्यावी लागते. दरम्यान, चीनने 4 लसींची निर्मिती केली आहे.चीनने स्वत:ची लस तुर्की, इंडोनेशिया आणि कंबोडिया या देशांकडे पाठविली आहे. युनायटेड नेशन्समधील चीनच्या राजदूतांनी सांगितले की, चीन यूएन शांतता दूतांसाठी कोविड -19 लसीचे तीन लाख डोस देईल. परंतु ही लस भारतासारख्या देशात उपलब्ध नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनने या वर्षाच्या अखेरीस किंवा 2022 च्या मध्यापर्यंत आपल्या लोकसंख्येच्या 70-80 टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील रोग नियंत्रण केंद्राच्या प्रमुखांनी (सीडीसी) शनिवारी हे सांगितले. सीडीसीचे प्रमुख गाओ फू यांनी शनिवारी चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेला म्हटले की, चार लसींच्या मंजुरीमुळे चीन 90 दशलक्ष ते एक अब्ज लोकांना लस देण्यास सक्षम झाला आहे.

China visa condition, you have to take Chinese vaccine, only those who do so will get easy entry into the country

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*