चीनचे तवांग वर अतिक्रमण; अब्दुल्ला, ओवैसी, चौधरींचे भारतालाच उफराटे बोल


वृत्तसंस्था

श्रीनगर : अरुणाचल प्रदेशात चीनने केलेले अतिक्रमण भारतीय सैन्य दलाने आपल्या पराक्रमाने उखडल्यानंतर देखील विरोधकांची मोदी सरकार विरुद्ध सुरू असलेली कोल्हेकोई थांबलेली नाही. तवांग वर अतिक्रमण केल्याबद्दल चीनवर आगपाखड करण्याऐवजी भारतातले सर्व विरोधी पक्षाचे नेते केंद्र सरकारवरच दुगाण्या झाडत आहेत. China’s Encroachment on Tawang; Abdullah, Owaisi, Chowdhury should speak only to India

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी चीनच्या अतिक्रमणाबद्दल केंद्र सरकारला दोष दिला आहे. हे दुर्दैव आहे की भारत आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू शकत नाही. पाकिस्तानशी भारताचे संबंध कसे आहेत हे आपल्याला आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे. पण चीन बरोबर देखील भारताचे संबंध चांगले नाहीत आणि भारत सरकार चीन बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करूही इच्छित नाही, असा आरोप अमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील चिनी अतिक्रमणावरून केंद्र सरकारलाच बोल लावले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरट म्हटले आहे. चीन आपल्या भूमीवर अतिक्रमण करतो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी चीनचे नाव घ्यायला घाबरतात, असा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी यांनी देखील मोदी सरकार तवांग मधील चिनी अतिक्रमणाच्या वस्तुस्थितीची माहिती लपवत असल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षांचे बहुतेक नेते एकसूरात चीनवर शरसंधान साधण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकारवर शरसंधान साधण्यात धन्यता बाळगत आहेत.

China’s Encroachment on Tawang; Abdullah, Owaisi, Chowdhury should speak only to India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात